7 दिवसांसाठी 70 रुमचं बुकिंग, बाकीच्यांना 'नो एन्ट्री', आमदार थांबलेल्या हॉटेलचा खर्च किती?

गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत.
7 दिवसांसाठी 70 रुमचं बुकिंग, बाकीच्यांना 'नो एन्ट्री', आमदार थांबलेल्या हॉटेलचा खर्च किती?
Shiv Sena MLAs in radisson blu hotelMumbai Tak

गुवाहाटी: गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध लढण्याचे कुभांड याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात रचले जात आहे.

सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या पंचतारांकित हॉटेलमध्ये 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बंडखोर आमदार सोमवारी भाजपशासित गुजरातमधील हॉटेलमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसामामधिल गुवाहटीला हालवला.

7 दिवसांसाठी 56 लाख?

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये (Radisson blu guwahati) रुमसाठी सात दिवसांचा दर 56 लाख रुपये आहे. हॉटेलमधिल काही सूत्रांनी आणि स्थानिक राजकारण्यांच्या मते इथे फुड आणि इतर सेवांचा दररोजचा खर्च अंदाजे 8 लाख रुपये आहे म्हणजे सात दिवसांचा संपूर्ण खर्च 1.14 कोटी रुपये आहे.

इतरांसाठी रुमचे बुकींग बंद

हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या बाकी सहकाऱ्यांसाठी 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. बाकी रुमचे बुकींग हॉटेल प्रशासनाने बंद ठेवले आहे. एवढेच नाहीतर आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांव्यतिरीक्त लोकांसाठी हॉटेलमधील फूड देखील बंद ठेवले आहे. या संपूर्ण ऑपरेशनच्या खर्चात चार्टर्ड विमाने आणि इतर वाहतुकीच्या खर्चाचा समावेश आहे. बाकी खर्चाची माहिती अजून समोर आलेली नाही.

radisson blu guwahati
radisson blu guwahati

40 आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहटीमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. शिवसेनेच्या या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको अशी मागणी केली आहे. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या आमदारांना खूप त्रास सहन करावा लागला अशा तक्रारीही आमदारांनी केल्या आहेत. काही बंडखोरांनी म्हटले आहे की शिवसेनेने नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत युती करावी. एकनाथ शिंदे गटाने एका आठवड्यासाठी हॉटेल बुक केले आहे यावरुन असे समजते की बंडखोरीचे सत्र अजून काही दिवस चालणार आहे.

radisson blu guwahati
radisson blu guwahati

दरम्यान काल संजय राऊतांनी म्हटले आहे की बंडखोरांची जर इच्छा असेल तर आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू, परंतु तुम्ही २४ तासात महाराष्ट्रात या, आपण बैठक करु आणि निर्णय घेऊ. एकनाथ शिंदेंकडे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील शिवसेनेला असा निर्णय घ्यावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in