'आमचं ठरलंय...', संभाजीराजेंनी आणखी सस्पेन्स वाढवला!

माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असून आमचं सगळं ठरलं असं अशी प्रतिक्रिया देऊन संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतील सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
'आमचं ठरलंय...', संभाजीराजेंनी आणखी सस्पेन्स वाढवला!
what to do next is decided in detail i have spoken to cm uddhav thackeray said sambhajiraje

कोल्हापूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं होतं की, राज्यसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे असणार आहेत. पण दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे शिवसेना आपली मतं संभाजीराजेंना देणार की नाही? याविषयी काल दिवसभर बरीच चर्चा सुरु होती. दरम्यान, आता सगळ्यात संभाजीराजे यांनी अगदी मोजक्या शब्दात पण अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा संभाजीराजे नेमकं काय म्हणाले:

'माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते त्याप्रमाणे करतील. मला हा देखील विश्वास आहे की, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.' असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

'आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो. आम्ही त्यांना सांगितलं... प्रस्ताव नाही, आम्ही सांगितलं त्यांना की, तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा.' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे जर संभाजीराजे अपक्ष निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांना मतं देणार नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं होतं.

अशातच संभाजीराजेंनी आज दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आणखी सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे शिवसेनेत जाणार की मविआ पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

what to do next is decided in detail i have spoken to cm uddhav thackeray said sambhajiraje
SambhajiRaje: आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग ते.. ही उद्धवजींच्या 'मन की बात': राऊत

दरम्यान, 19 मे रोजी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल 35 मिनिटं चर्चा झाली होती. जाणून घ्या त्यावेळी नेमकी काय झाली होती चर्चा.

1. छत्रपती संभाजीराजे शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोबतच असतील.

2. राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजे समर्थन करतील. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकिय निर्णयांना संभाजीराजे यांचा पाठिंबा राहील.

3. अगामी सर्व निवडणुकांमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचा प्रचार करणार. विशेषतः मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत.

4. शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे असले तरी संभाजीराजे शिवसेनेचे 23 वे खासदार म्हणूनच कार्यरत राहतील.

5. छत्रपती संभाजी राजे यांनी 'स्वराज्य' संघटनेची घोषणा करून सर्वपक्षीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे यांच्या या निर्णयामुळेच शिवसेनेला हा प्रस्ताव द्यावा लागला आहे. यावेळी संभाजीराजे यांनी काही सुधारणाही सुचवल्या होत्या.

6. संभीजीराजे यांच्या सुधारीत प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्यावरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार म्हणून शिवसेना त्यांचा निर्णय जाहीर करेल.

या दोन नेत्यांमध्ये सुमारे 35 ते 40 मिनिटं चर्चा झाली होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली होती. सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in