Andheri By poll : कुणाची सरशी? काय लागणार निकाल?काही तासातच चित्र स्पष्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पोटनिवडणूक पार पडली. आता लक्ष लागलं आहे ते निकालाकडे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होईल. साधारण ११ ते ११.३० च्या दरम्यान सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Andheri by Election Result Live : पहिल्या फेरीचा कल समोर, ऋतुजा लटकेंना किती मतं?

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे. एकूण २५६ मतदान केंद्रांवर, ८१ हजार मतदारांनी हक्क बजावला.

अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.

ADVERTISEMENT

हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. तरीही या निवडणुकीत मतदान खूप कमी झाल्याने नेमका काय निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT