राहुल गांधी जेव्हा कॉम्प्युटर न पाहिलेल्या मुलाला कॉम्प्युटर भेट देतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा चांगलीच चर्चेतही आहे. यात्रेला प्रतिसादही मिळतो आहे. गुरूवारी राहुल गांधी यांनी भाषण करत असताना दोन लहान मुलांचा उल्लेख केला होता. या लहान मुलांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले होते की जी दोन मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर बनू इच्छितात त्यांनी अजून कॉम्प्युटर पाहिलेला नाही तसंच त्यांच्या शाळेतही कॉम्प्युटर नाही.

राहुल गांधी यांनी या दोन मुलांचं कॉम्प्युटरचं स्वप्न पूर्ण केलं

राहुल गांधी यांनी भाषणात ज्या दोन मुलांचा उल्लेख केला होता त्या दोन मुलांच्या घरी जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉम्प्युटर भेट दिले. राहुल गांधीही तेव्हा या दोन मुलांच्या घरी उपस्थित होते. या दोन मुलांचं सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं स्वप्न आहे. राहुल गांधी यांनी या दोघांनाही कॉम्प्युटर दिल्याने ते पूर्ण होण्यास मदत होणार आहे कारण या दोघांनी आत्तापर्यंत कॉम्प्युटर पाहिलेलाही नव्हता.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे?

एका मुलाला, दोन मुलांना तर आम्ही कॉम्प्युटर दिले. मात्र आमचा हा मानस आहे की एकाही भारतीय मुलाचं स्वप्न चिरडलं जाऊ नये. देशातल्या प्रत्येक मुलाला तांत्रिक शिक्षण मिळालं पाहिजे हे स्वप्न दिवंगत राजीव गांधी यांनी पाहिलं होतं ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोना काळात कॉम्प्युटरच्या अभावी अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आलं नाही. त्यांची स्वप्नं त्यांच्या अश्रूंमध्ये वाहून गेली. मात्र आता भारत जोडो यात्रा याचसाठी काढली आहे की अशा मुलांची स्वप्नं आम्हाला पूर्ण करायची आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल गांधी हे त्यांच्या भाषणात काय म्हणाले होते?

राहुल गांधी म्हणाले, आम्ही रोज सात-आठ तास चालतो. शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना भेटतो. तुमचं म्हणणं ऐकतो. तुमचं दुःख समजतो. मी एकटाच नाही तर सगळेच काँग्रेसचे नेते. आम्ही त्याच रस्त्यावर चालत आहे. ज्यावर तुम्ही चालतो. ते म्हणाले, आज सकाळी मला दोन लहान मुले भेटले. दोघे भाऊ होते. मी त्यांना विचारलं काय करता, तुम्हाला काय बनायचं आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला , शिकतोय. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. त्याला विचारलं, शाळेत जातो. तो म्हणाला हो जातो. मी त्याला विचारलं तू कधी कॉम्प्युटर पाहिला आहे. तो म्हणाला नाही. मला वाईट वाटलं. मी त्याला विचारलं तुझ्या शाळेत कॉम्प्युटर नाही का? तो म्हणाला नाही. काही नाही आहे कॉम्प्युटर शाळेत? कारण भारतातील सर्व धन दोन-तीन उद्योगपतींच्या हातात चालले आहे. म्हणून शाळेत कॉम्प्युटर नाही. आज या मुलांचं स्वप्न राहुल गांधी यांनी पूर्ण केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT