Congress, NCP ‘वंचित’सोबत येण्यासाठीचा तिढा नेमका कुठे? आंबेडकरांनी दिलं सविस्तर उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : इंडिया टूडे-सी व्होटर्सने आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला ३४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र शिवसेना-वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यानंतर महाराष्ट्रात किमान ४० जागा निवडून आणू शकतो. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आले नाहीत तरी आम्ही दोन्ही पक्ष मिळून ३० जागा निवडून आणू शकतो, असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते ‘मुंबई तक’ च्या आजचा मुद्दा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केलं. (Where exactly is the rift to come Congress, NCP with ‘Vanchit bahujan aaghadi prakash Ambedkar gave a detailed answer)

वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस का येत नाही? तिढा नेमका कुठे?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही एमआयएमसोबत एकत्र होतो. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ते १९८० पासून सातत्याने पराभूत होत असलेल्या १२ जागांची मागणी केली. पण त्यांनी त्या जागा देण्यास असर्थता दर्शविली. आम्ही वेगळे लढलो, ज्याचा फटका दोघांनाही बसला.

हा तिढा कुठे आहे ते लक्षात घ्यायला हवं. वंचित बहुजन आघाडी पहिल्यापासूनच वंचितांचा प्रश्न मांडतं आहोत. त्यामध्ये असणारा गरीब मराठा, ओबीसी, भटके विमुक्त आणि अनुसूचित जाती यांचा समावेश आहे. यावर काँग्रेसमधील एका नेत्याने तुमचा कॅनव्हास कमी करा आणि आदिवासी, अनुसूचित जाती यांच्यापुरते मर्यादित राहिलात तर आम्ही तुम्हाला १२ जागा देऊ असा सल्ला दिला. मी त्यांना म्हटलं १२ जागा देऊन तुम्ही हात कापून देणार असाल ते पटणार नाही. त्यामध्ये उपयोग काय आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर का देत नाही याच कारण महाराष्ट्रातील सत्ता ही श्रीमंत मराठ्यांच्या हातात आहे. तो काँग्रेसमध्ये आहे, तो राष्ट्रवादीमध्ये आहे, तो भाजपमध्ये आहे. या तिन्ही पक्षातील आमदारांची यादी काढा आणि यांचे किती जवळची नाती आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ दे. काका, मामा, यांच्यात सत्ता फिरत राहितीय. इतरांना इथे स्थान नाही. ही सत्ता हातातून जाऊ नये हा प्रयत्न या तिन्ही पक्षातील श्रीमंत मराठ्यांचा आहे.

Pathaan च्या तिकिटामुळे भामटा जाळ्यात सापडला… गर्लफ्रेंडसमोरच आवळल्या मुसक्या

ADVERTISEMENT

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती घाईघाईत झाली का?

चार महिन्यांपासून या युतीबाबतच्या चर्चा सुरु होत्या. उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मग युतीची घोषणा करुया. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा याबाबतचा निर्णय होत नव्हता. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपल्याला जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही, त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी या युतीची घोषणा करण्यात आली.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे मातोश्रीसोडून आंबेडकर भवनला आले कारण…

काही सामाजिक संदेश देण्यासाठी एका कार्यक्रमाला मी त्याठिकाणी गेलो होतो. त्यामुळे युतीची घोषणा आंबेडकर भवनला करायची असं ठरलं. त्यानुसार स्क्रिप्ट तयार झाली आणि युतीबाबतची घोषणा झाली. आमचं जागावाटपही ठरलं आहे, फक्त आता आम्ही ते लोकांसमोर आणतं नाही. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आले तरी काय करायचं आणि नाही आले तरी काय करायचं हे नियोजन ठरलं असल्याचं सांगतं प्रकाश आंबेडकर यांनी ही युती घाईघाईत झालेली नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकर यांची सविस्तर मुलाखत :

    follow whatsapp

    ADVERTISEMENT