निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह का गोठवलं? पुढे पर्याय काय?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकीय पक्ष म्हणलं तर तिथे आयडेंटी म्हणजे ओळख ही आली. मग ते नेत्याचा चेहरा असो, पक्षाचा नाव असो किंवा पक्षाचं चिन्ह, हे त्या पक्षाची ओळख बनून जाते. आणि ही ओळख बनताना लगेच बनत नाही, त्याला बराच काळ रुजायला लागतो. त्यामुळे आयडेंटी ही फार महत्वाची असते. म्हणून निवडणुकीत अपक्ष उमेदवारापेक्षा पक्षाच्या उमेदवाराला वेगळं महत्व असतं. आज देखील ग्रामीण भागात जुने लोकं मतदान करताना उमेदवाराच्या नावापेक्षा पक्षाचं चिन्ह लक्षात ठेवतात आणि मतदान करतात. असं बोललं जायचं की कट्टर शिवसैनिक हा धनुष्यबाणाच्या चिन्हाव्यतिरिक्त इतर चिन्हाच्या समोरील बटन दाबूच शकत नाही.

पण आता काही कालावधीसाठी का होईना शिवसैनिकांना धनुष्यबाणाचा चिन्ह निवडणुकीत पहायला मिळणार नाही. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेत सुरु असलेल्या वादामुळं धनुष्यबाण हा चिन्ह गोठवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्याचबरोबर फक्त शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. आता नेमकं निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात काय म्हटलंय? आहे आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊ.

नेमकं काय म्हटलंय आयोगाच्या ऑर्डरमध्ये

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यासर्वांची सुरुवात झाली ती 21 जून 2022 रोजीपासून. विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. त्यादरम्यान पुढील कायदेशीर पेच लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी निवडणुकीत आयोगाला काही पत्र पाठवले. आमच्या पक्षात काही पक्षविरोधी कारवाया सुरु झाल्या आहेत. त्यामुळं शिवसेना आणि बाळासाहेब या नावाचा उपयोग करून कुणालाही पक्ष स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, असं त्यात नमूद केलं.

1 जुलैला पुन्हा अनिल देसाईंनी पत्र लिहलं आणि एकनाथ शिंदे नेते आणि उपनेते गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि तानाजी सावंत यांना आम्ही पक्षातून बरखास्त केलेलं आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर 4 जुलैला 25 जून रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख राहतील असा निर्णय झाल्याचं आयोगाला कळवलं. त्यानंतर 19 जुलैला एकनाथ शिंदेनी आयोगाकडे चिन्हावर दावा केला. पुढच्या काळात न्यायालयात एकूण सर्व वादांवर सुनावणी सुरु झाल्या.

ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि चिन्हाची चर्चा सुरु

ADVERTISEMENT

मधल्या काळात चिन्हाच्या बाबतीत जास्त चर्चा नव्हती पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळं या निवडणुकीत चिन्हावर पुन्हा चर्चा सुरु झाली. उद्धव ठाकरे गटाकडून मयत झालेले आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या नावाची घोषणा झाली. तर शिंदे आणि भाजपकडून भाजपचे मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. बंडानंतर पहिल्यांदाच होत असलेली ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. अशात ऋतुजा लटके या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार का? चिन्ह कोणाला मिळणार? चर्चा सुरु झाल्या.

उद्धव ठाकरे गटाकडून म्हणणं सादर झालं नाही

नंतर एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत आयोगाकडे आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी धनुष्यबाण चिन्ह द्यावं, अशी मागणी केली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दोनदा आयोगाकडे वेळ मागून घेतला होता. शनिवारी 2 वाजेपर्यंत आयोगाने वेळ देखील दिला, पण उद्धव ठाकरे गटाकडून म्हणणं सादर झालं नाही. त्याच्या काही तासातच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हा चिन्ह गोठवला आणि दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असा आदेश काढला.

राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

त्यापूर्वी अंधेरी पूर्वच्या निवडणुकीसंबंधी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवलं होतं. या निवडणुकीत दोन्ही गटाकडून उमेदवार देण्यात आले तर अशा पेचप्रसंगात कुणाला चिन्ह देण्यात यावं? अशी विचारणा केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी चिन्हाचा निर्णय घेणं गरजेचं होतं.

चिन्ह कायम गोठवला का?

आता हा निर्णय अंतिम आहे का? तर नाही. शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत सुरु असलेल्या लढाईचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती अशीच असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भलेही हा अंतिम नसून अंतरिम निर्णय असला तरी अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवलेलं असू शकतं. याचा अर्थ निवडणूक आयोगाला कागदपत्रे छाननीसाठी लागणाऱ्या आणि निर्णय देईपर्यंत लागणाऱ्या वेळेपर्यंत चिन्ह फ्रिज राहू शकतो. म्हणजे हा निर्णय फक्त अंधेरी पूर्वच्या निवडणुकीतपर्यंतचं राहणार नाही. त्यापुढे देखील महानगपालिकेच्या निवडणुका लागल्या तर दुसरं चिन्ह घेऊन दोन्ही गटांना निवडणूक लढवाव्या लागतील.

शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, याचा अर्थ काय?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही. याचा अर्थ फक्त शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. पण शिवसेना या नावापुढं काहीतरी नाव लावून त्याची आयोगाकडून मान्यता मिळवून वापरता येईल. उदारणार्थ : शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आनंद दिघे, शिवसेना A, शिवसेना B असं करू शकतात. जसं इंदिरा गांधींच्या काळात अशा परिस्थितीत काँग्रेस ओ, काँग्रेस आर असं नाव वापरावं लागलं होतं. पण आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्याची दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आल्याने, हे नाव कोणालाच न मिळण्याची शक्यता आहे. तर प्राधान्याक्रमानुसार नावं द्यावं लागतील.

कोणतं चिन्ह घेऊन लढावं लागेल?

आता एकूण 198 फ्री चिन्ह आहेत आयोगाकडे. त्यापैकी 3 चिन्ह प्राधान्याने दोन्ही गटाला सोमवारी आयोगाकडे सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर. नियमाच्या अधीन राहून इतर चिन्हाची देखील मागणी करू शकतात. आता उरलेल्या 198 चिन्हांपैकी दोन्ही गटाकडून कोणत्या चिन्हाची मागणी केली जाईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रामुख्याने साधता अंधेरी पूर्वच्या निवडणुकीसाठी तरी उद्धव ठाकरे गटाला चिन्ह महत्वाचा राहणार आहे. कारण त्यांचा उमेदवार रिंगणात असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT