"एक चुकीची खेळी आणि सत्तेचा पट हरलो" असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांना वाटणारी चुकीची खेळी कोणती असू शकते? काय असू शकतात शक्यता वाचा सविस्तर बातमी
"एक चुकीची खेळी आणि सत्तेचा पट हरलो" असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Why did Devendra Fadnavis said one wrong move and I lost the power game?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. एक चुकीची खेळी केली आणि मी सत्तेचा पट हरलो असं वक्तव्य त्यांनी पुण्यातल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घटना दरम्यान केलं आहे. देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते तंतोतंत खरं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमुळेच सर्वाधिक जागा मिळूनही देवेंद्र फडणवीस आज विरोधात बसले आहेत.

One wrong move and misreading the opponents and I lost the game of power from a winning position Says Devendra Fadnavis
One wrong move and misreading the opponents and I lost the game of power from a winning position Says Devendra Fadnavis

मात्र एक चुकीची खेळी केली तरीही आपण हरतो असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले असतील? याचा अंदाज लावण्याचा हा प्रयत्न आहे.

२०१९ ची विधानसभेची निवडणूक आठवली तर आपल्याला आठवतात ती ३६ दिवस चाललेली खलबतं. त्यानंतर झालेल्या अनेक घडामोडी आणि मग फायनली तयार झालेली महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना मिळालेलं मुख्यमंत्रीपद या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आहेतच. आता प्रश्न उरतो तो म्हणजे फडणवीसांची चुकीची खेळी कोणती? शिवसेनेसोबत सगळं काही ठरलं आहे असं भाजपकडून सांगण्यात येत होतं...

तसंच शिवसेनाही तेच म्हणत होती. तरीही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं कुठेही ठरलेलं नव्हतं हे फडणवीस म्हणाले आहेत. एकदा नाही तर वारंवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता कदाचित ते वाटून घेतलं असतं तर सत्तेत आले असते का? हे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं का? असेलच असा कोणताही दावा आम्ही करत नाही.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रितरित्या आलेली महाविकास आघाडी हा प्रयोग नंतर झाला त्या आधी सगळ्या महाराष्ट्राने पाहिला तो पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग. २३ नोव्हेंबर २०१९ ला टीव्ही लावल्या लावल्या सगळ्या महाराष्ट्राला दिसलं ते चित्र अद्यापही विसरी पडलेलं नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार काही मोजक्या आमदारांसह पाठिंब्याचं पत्र घेऊन फडणवीसांकडे आले होते हे त्यांनीच सांगितलं.

या घटनेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद त्या पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार परतणं या सगळ्याच घडामोडींनी हे सांगितलं की जे सरकार पहाटे स्थापन झालंय ते अस्थिर झालंय. त्यानंतर अजित पवारांचीही घरवापसी झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा प्रयोग ७२ तासांचा ठरला. हा प्रयोग म्हणजे त्यांची फसलेली खेळी होती का? कदाचित असेलही किंवा नसेलही तसा दावा आम्ही करत नाही. मात्र दस्तुरखुद्द फडणवीसांनीच हे मान्य केलं आहे की तो प्रयोग यशस्वी झाला नाही ते बरंच झालं.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फोटो-इंडिया टुडे

आता आपण जर थोडसं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकडे वळलो तर आणखी एक बाब लक्षात येते ती म्हणजे शरद पवारांवर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं शरसंधान. शरद पवार हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत मात्र सध्या आपल्याला समोरच्या मैदानात (विरोधी पक्ष) कुणी पैलवानच दिसत नाही. शरद पवार यांनी राजकारण सोडून द्यावं. शरद पवारांचं राजकारण आता संपलं आहे या आशयाची वक्तव्यंही देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे ही वक्तव्यं म्हणजे त्यांची फसलेली खेळी असेल का? तर तसाही आमचा दावा नाही. मात्र शरद पवार पावसात भिजले आणि त्यांनी भाकरी फिरवतात तशी सगळी निवडणूक फिरवली. परिवर्तन तर होणारच हा राष्ट्रवादीचा प्रचारातला नारा होता जो शरद पवारांनी खरा करून दाखवला.

(फाइल फोटो)

प्रचाराचाच विषय निघाला आहे तर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य कधीही विसरून चालणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता त्यांचं सरकार जात असताना शेवटच्या दिवशी सभागृहात म्हटली होती. त्या कवितेच्या या ओळी होत्या. त्या प्रचारात त्यांची कॅचलाईन ठरल्या. २०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २०१९ लाही तेच मुख्यमंत्री होणार हे भाजपने जाहीर केलं होतं. राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र अशाही घोषणा दिल्या गेल्या. या घोषणांएवढीच गाजली ती त्यांची मी पुन्हा येईन ही घोषणा. ते पुन्हा आले मात्र पहाटेच्या शपथविधीमुळे फार काळ टिकले नाहीत. पुढे महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जेव्हा पहिलं अधिवेशन भरवलं गेलं तेव्हा या पुन्हा येईन या वक्तव्याची सत्ताधाऱ्यांनी यथेच्छ खिल्लीही उडवली. हे वक्तव्य म्हणजे त्यांची फसलेली खेळी असू शकते का? तर असा आमचा दावा मुळीच नाही. मात्र हे वक्तव्य जेवढं चर्चेत राहिलं तेवढंच चेष्टेचाही विषय ठरलं हे विसरता येणार नाही.

Why did Devendra Fadnavis said one wrong move and I lost the power game?
निवडणुकीच्या आधीच मी पुन्हा येईन म्हणत होते, मी येऊ दिलं नाही! शरद पवारांचा फडणवीसांना टोला

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. निकालाच्या दिवशीच भाजप आणि शिवसेना एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तुटली होती. पण निकालाच्या दिवशी शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचं २०१४ ला जाहीर केलं आणि शिवसेनेची कोंडी केली. त्यानंतर मग सत्ता हातातून जाऊ नये म्हणून शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे युती टिकली. फडणवीसांचं सरकारही चाललं. अगदी तशाच प्रकारे शिवसेना आपल्यासोबतच येईल असं भाजपला आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये वाटलं असावं. शिवसेना सत्तेसोबत काँग्रेससोबत जाणार नाही हे गृहित धरणं ही फडणवीसांची फसलेली खेळी होती का? तर तसाही आमचा दावा नाही मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे मागच्या अडीच वर्षांपासून चालवत आहेत हे नाकारून चालणार नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.PTI

राजकारण म्हटलं की बुद्धिबळ, बुद्धिभेद, साम-दाम-दंड-भेद या सगळ्या नीती आल्याच. आज अडीच वर्षांनी फडणवीसांना एक चुकीची खेळी आपण केली आणि सत्तेचा पट हरलो असं वाटतं आहे. तसं त्यांनी ते जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. तसंच राजकारणात बुद्धिबळाइतकंच सावध असलं पाहिजे नाहीतर ग्रँडमास्टरलाही पराभव स्वीकारावा लागतो असंही ते म्हणाले आहेत. त्यांची ही चुकलेली खेळी कोणती होती ते फडणवीसच जाणोत मात्र ही त्याची उत्तरं असू शकतात. कदाचित ते या प्रश्नाचं उत्तर देणारही नाहीत कारण देवेंद्र फडणवीस जे वक्तव्य करतात त्याची पाठराखण कशी करायची हे फडणवीसांना चांगलंच ठाऊक आहे. ते कधीही शब्दांमध्ये अडकत नाहीत त्यामुळे त्यांना फसलेली खेळी कोणती असा प्रश्न उद्या विचारला गेला तरीही ते उत्तम पद्धतीचं उत्तर देतील यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in