"प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं?" मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य

नागपूरच्या रेशीम बाग या ठिकाणी झालेल्या सभेत मोहन भागवत यांचं वक्तव्य
"Why search Shivling in every mosque?" Mohan Bhagwat's big statement about Gyanvapi
"Why search Shivling in every mosque?" Mohan Bhagwat's big statement about Gyanvapi

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा देशात चांगलाच चर्चेत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मंदिरांसाठी कोणतंही आंदोलन करणार नाही ही बाब त्यांनी स्पष्ट केली आहे. तसंच आपल्या भाषणात त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचाही उल्लेख केला.

(फोटो सौजन्य: फेसबुक)

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं यासाठी जे आंदोलन उभं राहिलं त्यात संघ होताच, आम्ही ती बाब नाकारलेली नाही. मात्र त्यावेळी संघाने आपली मूळ वृत्ती बाजूला ठेवत त्या आंदोलनात हिस्सा घेतला होता. आता भविष्यात संघ कुठल्याही आंदोलनाचा भाग असणार नाही. इतिहास कधी बदलता येत नाही. ज्ञानवापीचा आपला मुद्दा आहे, तो हिंदू मुस्लिमांशी जोडणं योग्य होणार नाही.

मुस्लिम राज्यकर्ते हे बाहेरून आले होते. प्रत्येक मंदिरात शिवलिंग शोधण्याची गरज नाही. काही गोष्टी या श्रद्धास्थान असू शकतात. पण प्रत्येक मुद्द्यावर लढाई करणं, वाद वाढवणं योग्य नाही. देशातल्या कुठल्याही दोन समुदायांमध्ये लढाई होणं, वाद होणं योग्य नाही. भारत विश्वगुरू कसा होईल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जगाला शांततेचा संदेश द्यायला हवा.

कोरोना काळात आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगलं काम केलं आहे. कोरोना पीडितांची आपण सेवा केली आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे कसं जाता येईल हे आपल्याला आता पाहायचं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जो विकास आणि प्रगती होईल ती आपलं स्व आहे.

धर्माचं रक्षण करण्याच्या दोन पद्धती आहेत. धर्म आचरणाने वाढतो, तसंच आपसात लढून काहीही साध्य होत नाही. सगळ्या जगाला हा संदेश द्यायची ही वेळ आहे, असंही मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं आहे.

"Why search Shivling in every mosque?" Mohan Bhagwat's big statement about Gyanvapi
कवी मनोज मुंतशीर यांची कविता झाली व्हायरल, ज्ञानवापी मशिद वादाच्या धर्तीवर कविता ठरतेय चर्चेचा विषय

मुस्लिम आणि हिंदूनी आपआपसात समन्वय ठेवत सर्वसंमतीने आणि न्यायालयाचा सन्मान राखत यातून मार्ग काढला पाहिजे. मात्र, आपल्या स्वार्थासाठी देशात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात फसू नये, असे आवाहन मोहन भागवत यांनी केलं. जेव्हा इस्लाम आक्रमकांच्या माध्यमातून भारतात आला, तेव्हा भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हजारो देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाही, तर त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे असे हिंदूना वाटते. पण मनात प्रश्न निर्माण होतात. असे काही असेल तर एकत्र येऊन प्रश्न सोडवा असेही भागवत म्हणाले.

"Why search Shivling in every mosque?" Mohan Bhagwat's big statement about Gyanvapi
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा नेमका वाद कधी सुरू झाला?

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा वाद काय?

१८ ऑगस्ट २०२१ ला वाराणसीतल्या पाच महिलांनी श्रृंगार गौरी मंदिरात रोज पूजा करण्याची आणि दर्शन घेण्यासाठी मागणी पुढे करत कोर्टात याचिका दाखल केली होती. या नंतर जज रवि कुमार दिवाकर यांनी मंदिरात सर्व्हे आणि व्हीडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी १० मे पर्यंत अहवाल द्यावा असंही सांगितलं आहे. याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांचा वाद आजचा नाही. हा वाद १९९१ पासून कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद येथील हायकोर्टात सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांच्यातला वाद काही प्रमाणात अयोध्यासारखाच आहे.

या वादामध्ये अनेक पैलू आहेत. अयोध्या प्रकरणात मशीद होती आणि मंदिर तयार झालं नव्हतं. मात्र या प्रकरणात मंदिर आणि मशीद दोन्ही तयार आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षकारांचं म्हणणं हे आहे की मशीद तिथून हटवण्यात यावी आणि ती जमीन मंदिराला मिळावी. कारण मशीद ही मंदिर तोडून बांधण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मशीद हटवण्यात यावी आणि ती जागा आम्हाला देण्यात यावी असं हिंदू पक्षकरांचं म्हणणं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in