एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ खडसे हे जाहीर सभेत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षात असलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येतील अशा चर्चा आहेत याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी मला याबाबत कल्पना नाही असं उत्तर दिलं आहे. एका ओळीत उत्तर देऊन त्यांनी हा विषय संपवला आहे.

एकनाथ खडसेंनी अनेकदा केलीये फडणवीसांवर टीका

एकनाथ खडसे हे भाजपमधून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा झालेल्या प्रवेश सोहळ्यात आणि त्यानंतर अनेकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे. माझं राजकीय करीअर संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासह अनेक आऱोप त्यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांचा विशेष राग असल्याचंही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांतून समोर आलं आहे. अशात आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आलेलं असताना एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमित शाह यांच्या भेटीवर काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसेंनी अमित शाहांच्या भेटीनंतर टीकाकारांनाच खडसावलं आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. मी ज्यावेळी दिल्लीत जातो त्यावेळी अमित शाह, राजनाथ सिंग, पियुष गोयल, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांना भेटत असतो. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे त्यांच्याशी संबंध आहेत. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटेल मग त्याचा लगेच चुकीचा अर्थ काढू नका, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

खासदार रक्षा खडसे काय म्हणाल्या?

खडसे-शाहांच्या भेटीवरुन वातावरण तापलेलं असताना खडसेंच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी यावर आपलं मौन सोडलंस आहे. एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलो होतो पण कार्यक्रम व्यस्ततेमुळे भेट होऊ शकली नाही. मात्र फोनवर अमित शाह आणि एकनाथ खडसेंचे बोलणं झालं आहे, भेट झाल्याचं लोक राजकारण करणारच, मी भाजपमध्येच आहे आणि एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतच आहेत असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. फोनवरती नक्की काय बोलणं झालं हे बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT