जोगेंद्र कवाडेंशी हातमिळवणी करून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना शह देण्यात यशस्वी होतील?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एकाच स्टेजवर दिसले आणि चर्चा सुरु ती शिवशक्ती- भीमशक्ती युतीची…या चर्चेला दुजोरा दिला वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी…सुभाष देसाई आणि रेखा ठाकूर यांच्यात युतीची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या या जुळवाजुळवीला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनीही भेटीगाठींचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. शिवशक्ती आणि भीमशक्ती युती होण्य़ाच्या आधीच या युतीला टक्कर देण्याची रणनिती शिंदे गटाने आखली आहे. काय आहे ही शिंदेंची रणनिती? जोगेंद्र कवाडे कोण आहेत आणि जोगेंद्र कवाडेंशी युती करुन ठाकरेंना शिंदे कसं देणार उत्तर जाणून घेऊ

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठळक बदल कोणता जाणवत असेल तर महाराष्ट्रातल्या छोट्य़ा पक्षांना आणि संघटनांना आलेले महत्व. ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून या पक्षांना आणि संघटनांना आपपल्या गटात ओढण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत.

या रणनीतीचा भाग म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या या संदर्भात बोलणी सुरु आहे. मविआतल्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी देखील चर्चेची तयारी दाखवली आहे. तेव्हा आंबेडकरांची वंचित आघाडीने ठाकरेंशी युती केली तर दलित आणि मुस्लीम मतांची एक मोठी व्होटबँक मविआच्या पाठीशी उभी राहू शकते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे हिंदुत्वाचा नारा देत निवडणुका लढवणाऱ्या भाजप आणि शिंदे गटानेदेखील दलित आणि मुस्लीम मतांकडे स्वत:चे लक्ष वळवले असून त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एकनाथ शिंदें आणि जोगेंद्र कवाडे यांची भेट झाली असावी. जोगेंद्र कवाडेंनी यासंबंधी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने योग्य प्रस्ताव दिला तर त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे असं विधान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.

जोगेंद्र कवाडे हे दलित चळवळीतले एक प्रमुख नाव असून औरंगाबादच्या नामांतर चळवळीत त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जोगेंद्र कवाडे यांनी हजारो आंबेडकरवादी युवकांना एकत्र घेऊन त्यांनी दीक्षाभूमी (नागपूर) ते औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला होता.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या चिमूर लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाकडून ते १२ व्या लोकसभेत निवडून गेले होते. खासदार झाल्यानंतर संघटनेत झालेल्या मतभेदामुळे कवाडेंनी Peoples Republican Party या पक्षाची स्थापना केली. दलित समाजाचे नेतृत्व करणारा रिपब्लिकन पक्षाची आज अनेक शकलं झाली असून अनेक गट कार्यरत आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा सु गवई, जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे, खरात ही प्रमुख नावं आहेत.

ADVERTISEMENT

जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती करुन शिंदे गटाकडून ठाकरे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरु दिसतो. रामदास आठवले यांचा गट याआधीपासूनच भाजपसोबत आहे त्याला तर कवाडे गटाची जोड मिळाली तर शिंदें गटाला निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. कवाडे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नागपूर जिल्हात आहेत. भाजपचे जेष्ठ नेते नितिन ग़डकरी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत असं सांगितले जाते. तेव्हा या सगळी समीकरण लक्षात घेता कवाडे हे शिंदें गटासोबत घरोबा करु शकतात पण त्याचा फायदा निवडणुकांमध्ये मतांच्या रुपाने किती होईल हे बघणं औत्सुकाचे ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT