"बाळासाहेबांना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता?" संजय राऊत आणि शरद पवार म्हणाले...

जाणून घ्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि संजय राऊत यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे?
"बाळासाहेबांना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता?" संजय राऊत आणि शरद पवार म्हणाले...
Would Balasaheb have liked the Mahavikas Aghadi experiment?" Sanjay Raut and Sharad Pawar Answers the Question

महाराष्ट्राच्या राजकारणातला महाविकास आघाडीचा प्रयोग हा होईल असं कुणाला २०१९ पूर्वी सांगितलं असतं तर कुणाचाही विश्वास बसला नसता. सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी याच महाविकास आघाडीबाबत आणि बाळासाहेब ठाकरेंबाबत एक प्रश्न संजय राऊत आणि शरद पवार यांना विचारला. ज्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे.

पुण्यात शरद पवार, संजय राऊत यांची संयुक्त मुलाखत ज्ञानेश महाराव यांनी घेतली. या मुलाखतीत महाविकास आघाडीच्या प्रयोगाविषयी विचारण्यात आलेला प्रश्न हा चर्चेचा विषय ठरतो आहे. ज्ञानेश महाराव यांनी संजय राऊत यांना असं विचारलं की राज्यात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तो प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता का? या प्रश्नाला शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Would Balasaheb have liked the Mahavikas Aghadi experiment?" Sanjay Raut and Sharad Pawar Answers the Question
"एक चुकीची खेळी आणि सत्तेचा पट हरलो" असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

बाळासाहेब ठाकरेंना हा प्रयोग नक्कीच आवडला असता. मुळात बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना असं काही करायची हिंमतच झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असे नाही. फक्त आताचे शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण सगळ्यांनी ही टोकाची सुसंस्कृतता पाळायची नाही. आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव. बाळासाहेब नेहमी पवारांना म्हणायचे की आपण एकत्र आलो तर दिल्लीला झुकवू हे उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीचा हा प्रयोग बाळासाहेब ठाकरेंना नक्कीच आवडला असता असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. निकालानंतर भाजपला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. जनतेने स्पष्ट बहुमत युतीच्या पदरात टाकलं होतं. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला आणि मग टोकाला गेला. त्यामुळे युती तुटली आणि मग राज्याच्या राजकारणात न भुतो न भविष्यती असा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. हे सरकार मागच्या अडीच वर्षापासून काम करतं आहे. भाजपने हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असं वारंवार सांगितलं आहे तसंच हे सरकार पडण्याच्या तारखाही देऊन झाल्या आहेत. मात्र हे सरकार अद्याप शाबूत आहे. आता महाविकास आघाडीच्या या प्रयोगाबाबत बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं असतं? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार आणि संजय राऊत या दोघांनीही दिलं आहे. दोघांनीही हा प्रयोग त्यांना नक्कीच आवडला असता असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in