14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर
संग्रहीत छायाचित्र

14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर

घरच्या मैदानावर टीम इंडिया न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भीडणार

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा उत्तरार्ध सध्या युएईत सुरु आहे. सर्व भारतीय खेळाडू आयपीएलच्या हंगामात सहभागी झालेले असताना बीसीसीआयने 2021-22 साठीच्या भारतीय संघाच्या होम सिझनची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणिची आज बैठक झाली ज्यात हा निर्णय घेण्यात आला.

आगामी काळात भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 2022 सालच्या टी-20 विश्वचषकाचा विचार करुन बीसीसीआयने टी-२० सामन्यांच्या आयोजनावर अधिक भर दिला आहे. पुढील काही महिने भारतीय संघ घरच्या मैदानावर 14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच खेळणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
भारतीय क्रिकेटपटूंचं होणार Increament, BCCI कडून मॅच फी मध्ये वाढ

असं असेल भारतीय संघाचं आगामी हंगामाचं वेळापत्रक -

(भारत विरुद्ध न्यूझीलंड - 17 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर)

 • पहिला टी-20 सामना - (17 नोव्हेंबर, जयपूर)

 • दुसरा टी-20 सामना - (19 नोव्हेंबर, रांची)

 • तिसरा टी-20 सामना - (21 नोव्हेंबर, कोलकाता)

 • पहिला कसोटी सामना - ( 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर)

 • दुसरा कसोटी सामना - (3 ते 7 डिसेंबर, मुंबई)

(भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - 6 ते 20 फेब्रुवारी 2022)

 • पहिला वन-डे सामना - (6 फेब्रुवारी, अहमदाबाद)

 • दुसरा वन-डे सामना - (9 फेब्रुवारी, जयपूर)

 • तिसरा वन-डे सामना - (12 फेब्रुवारी, कोलकाता)

 • पहिला टी-20 सामना - (15 फेब्रुवारी, कटक)

 • दुसरा टी-20 सामना - (18 फेब्रुवारी, विशाखापट्टणम)

 • तिसरा टी-20 सामना - (20 फेब्रुवारी, त्रिवेंद्रम)

भारत विरुद्ध श्रीलंका - (25 फेब्रुवारी ते 18 मार्च 2022)

पहिला कसोटी सामना - (25 फेब्रुवारी ते 1 मार्च, बंगळुरु)

दुसरा कसोटी सामना - (5 मार्च ते 9 मार्च, मोहाली)

पहिला टी-20 सामना - (13 मार्च, मोहाली)

दुसरा टी-20 सामना - (15 मार्च, धर्मशाळा)

तिसरा टी-20 सामना - (18 मार्च, लखनऊ)

संग्रहीत छायाचित्र
जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण...England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - (9 ते 19 जुन 2022)

 • पहिला टी-20 सामना - (9 जुन, चेन्नई)

 • दुसरा टी-20 सामना - (12 जुन, बंगळुरु)

 • तिसरा टी-20 सामना - (14 जुन, नागपूर)

 • चौथा टी-20 सामना - (17 जुन, राजकोट)

 • पाचवा टी-20 सामना - (19 जुन, दिल्ली)

Related Stories

No stories found.