BCCI नं खेळाडूंबद्दल घेतले तीन मोठे निर्णय, बैठकीत काय ठरलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BCCI: भारतीय क्रिकेट संघाबाबतची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली होती. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत टीम इंडिया आणि खेळाडूंच्या भवितव्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाच्या वाईट कामगिरीनंतर, विशेषत: T20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद हुकल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन वर्षात पुन्हा संघात सुधारणा करण्यासाठी हे मोठे निर्णय घेतले आहेत. (BCCI review meeting took three major decisions regarding the players)

मंडळाने येथे दुखापती आणि वर्कलोड व्यवस्थापनाबद्दल देखील चर्चा केली. त्याचबरोबर यो-यो चाचणीसोबतच खेळाडूंना आता डेक्सा चाचणी देखील द्यावी लागणार आहे. जे खेळाडू दुखापतीनंतर किंवा विश्रांतीनंतर टीम इंडियामध्ये परततील त्यांना हे लागू होईल. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये निवडीसाठी युवा खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळावे लागणार आहेत.

Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

BCCI बैठकीत घेण्यात आलेले 3 मोठे निर्णय कोणते?

या बैठकीनंतर टीम इंडियातील नवीन खेळाडूंची निवड, त्यांचा फिटनेस आणि आयपीएलमधील महत्त्वाच्या खेळाडूंचा सहभाग याबाबत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले-

  • पहिला निर्णय म्हणजे, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी नव्या खेळाडूंना शक्य तितके देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत.

ADVERTISEMENT

  • दुसरा निर्णय, यो-यो चाचणी आणि डेक्सा चाचणी यापुढे निवडीचा एक भाग असतील आणि यांना खेळाडूंच्या सेंट्रल पूलमध्ये रोडमॅप अंतर्गत लागू केले जाईल.

  • ADVERTISEMENT

  • तर, तिसरा घेण्यात आलेला निर्णय हा आहे की, पुरुषांचा FTP आणि ICC क्रिकेट विश्वचषक 2023 ची तयारी लक्षात घेऊन, NCA आणि IPL फ्रँचायझी IPL 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंवर नजर ठेवतील.

  • डेक्सा चाचणी म्हणजे काय?

    डेक्सा चाचणीत हाडांची घनता म्हणजेच बोन डेंसिटी किंवा त्याला डेक्सा स्कॅन म्हणूनही ओळखले जाते. ही एक विशेष प्रकारची एक्स-रे चाचणी आहे जी हाडांची घनता मोजते. डेक्सा चाचणीद्वारे खेळाडूच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास किंवा हाडे कमकुवत असल्यास ते कळते. अशा स्थितीत भविष्यात कोणता खेळाडू तंदुरुस्त राहणार हे या चाचणीतून स्पष्ट केले जाते.

    या सर्व मुद्द्यांबाबत बीसीसीआयने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही बैठक आयोजित केली होती. कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विद्यमान निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केली आहे. आयसीसी वन-डे विश्वचषक २०२३ च्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT