IPL 2021 : Bio Secure Bubble म्हणजे नक्की काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना देशातील महत्वाच्या ६ शहरांमध्ये आयपीएलचे सामने होत आहेत. देशात आरोग्य व्यवस्थेवर एवढं मोठं संकट आलेलं असताना आयपीएलचे सामने खेळवण्याची गरज आहे का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गाजतोय. त्यातच KKR च्या संघातील दोन खेळाडूंना आणि CSK च्या संघातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआय बॅकफूटला गेलंय. यात भर म्हणून SRH च्या वृद्धीमान साहालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने यंदाचा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

परंतू, बायो सिक्युअर बबल तयार केलेलं असतानाही आयपीएलमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झालीच कशी असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. हे बायो सिक्युअर बबल असतं तरी काय हे आपण आज या व्हिडीओतून समजावून घेण्याचा प्रयत्न करुया.

खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी बीसीसीआय किंवा कोणतीही संस्था एक असं वातावरण तयार करते की ज्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर खेळाडूंचा बाहेरच्या जगाशी संपर्क येत नाही. म्हणजेच हॉटेलच्या रुमपासून ते मैदानात प्रवेश करेपर्यंत आणि सामना संपल्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये येईपर्यंत हे खेळाडू एका सुरक्षित वातावरणात असतात ज्यात त्यांचा कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी संपर्क येत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोठी बातमी! IPL चे सामने स्थगित, SRH च्या साहाला कोरोनाची लागण

पण हे सुरक्षित वातावरण म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

ADVERTISEMENT

१) हॉटेलमध्ये काही मजले हे खेळाडूंसाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफसाठी राखीव ठेवले जातात. या मजल्यांवर इतरांना प्रवेश मिळत नाही.

ADVERTISEMENT

२) इतकच काय तर या खेळाडूंच्या सेवेसाठी जो हॉटेल स्टाफ असतो तो स्टाफही फक्त याच खेळाडूंना सेवा देतो. जोपर्यंत खेळाडू हॉटेलमध्ये आहेत तोपर्यंत हॉटेलचा स्टाफ इतर कोणाच्याही संपर्कात येत नाही. इतकच काय तर संघाला हॉटेलपासून मैदानापर्यंत नेणारा बसचालक आणि क्लिनरही या बायो सिक्युअर वातावरणात असतात.

३) काही बायो सिक्युअर बबलमध्ये खेळाडूंना त्यांच्या परिवाराला भेटण्याची परवानगी नसते, परंतू आयपीएलमध्ये बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या परिवारालाही सोबत आणण्याची परवानगी दिली होती.

४) या बायो सिक्युअर बबलमध्ये प्रवेश करण्याआधी खेळाडूंची RTPCR टेस्ट केली जाते. या टेस्टचा निकाल निगेटीव्ह आला तर त्यांना लगेच आत प्रवेश मिळतो. पण एखाद्या खेळाडूच्या टेस्टचा निकाल जर पॉजिटीव्ह आला तर मात्र त्याला पहिले स्वतःला आयसोलेट करावं लागतं.

५) टीम मीटिंग, लंच-डिनर आणि सरावाचा वेळ सोडला तर खेळाडूंना सर्व काळ हा हॉटेलच्या रुममध्येच घालवावा लागतो. बबलमध्ये सर्व खेळाडू हे सुरक्षित वातावरणात आहेत की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येकाला एका ब्लू-टूथ बँड दिला जातो. या बँडद्वारे टीम मॅनेजमेंट खेळाडूंवर लक्ष ठेवतं

आता एवढी कठोर व्यवस्था आणि कडक नियम असतानाही KKR च्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे. . याच्याबद्दल अशी माहिती मिळतेय, की वरुण चक्रवर्तीचा खांदा दुखावला गेला होता. या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यासाठी ता बायो बबल मोडून बाहेर गेला होता. इथेच त्याला कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. याव्यतिरीक्त CSK च्या ३ सदस्यांना नेमकी कोरोनाची लागण कशामुळे झाली हे मात्र समजू शकलेलं नाही.

वरकरणी पहायला गेलं तर या प्रकारात बीसीसीआयला धक्का बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी KKR vs RCB चा सोमवारचा सामना रद्द करुन रिशेड्युल केला आहे. परंतू एखादा खेळाडू जर बायो सिक्युअर बबल मोडून बाहेर जात असेल तर तो पुन्हा संघाच्या बबलमध्ये प्रवेश करत असताना सर्व नियमांचं पालन झालं होतं का हे तपासणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता या नियमांचं पालन नक्कीच झालेलं नाही असं दिसंतय.

देश कोरोनाशी लढत असताना आयपीएल बंद करायचं की नाही हा वादाचा मुद्दा आहे. काहीचं मत सामने बंद करा असू शकतं तर काही जणांना आयपीएलचे सामने बंद व्हायला नकोयत. परंतू या घटनेनंतर बायो सिक्युअर बबलचा फुगा फुटलाय असं नक्कीच म्हणायला वाव आहे. आपणच आखलेल्या नियमांचं पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर संपूर्ण स्पर्धा धोक्यात येऊ शकते याचाच अनुभव सध्या बीसीसीआय घेतंय. त्यामुळे या बाबतीत पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT