IPL 2022 : यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही तरीही मुंबईने ‘या’ खेळाडूसाठी मोजले ८ कोटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा विजेतेपद मिळवून सर्वात यशस्वी संघ बनलेल्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात सर्वांना आश्चर्यचकीत करणारा एक निर्णय घेतला आहे. इशान किशनला पहिल्या दिवशी १५.२५ कोटी रुपये मोजत मुंबईने पुन्हा विकत घेतलं. यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी ८ कोटी रुपये मोजले.

जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. याचसाठी त्याने पहिल्यांदा लिलावासाठी आपलं नाव टाकलं नव्हतं, परंतू यानंतर आर्चर लिलावाच्या शर्यतीत दाखल झाला. अचानक नाव दिल्यामुळे बीसीसीआयने जोफ्रा आर्चर ज्या संघात जाईल त्या संघाला बदली खेळाडू मिळणार नाही अशी अट घातली होती. हा सर्व इतिहास डोळ्यासमोर असतानाही मुंबईने आर्चरसाठी ८ कोटी एवढी मोठी रक्कम मोजत त्याला संघात घेतलं आहे.

भविष्यात आर्चर जसुप्रीत बुमराहसोबत मुंबईच्या गोलंदाजीची कमान सांभाळेल हा विचार करुन मुंबईने आर्चरवर बोली लावल्याचं, संघाचे मालक आकाश अंबानी यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याव्यतिरीक्त मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला ८.२५ कोटीला, डॅनियल सॅम्सला २.६० कोटी रुपयांना, तिलक वर्माला १.७० कोटी रुपयांना, संजय यादवला ५० लाख, मयंक मार्कंडेला ६५ लाख, जयदेव उनाडकटला १.३० कोटी रुपयांना, मुरुगन अश्विनला १.६० कोटीला, बसील थंपीला ३० लाख, डेवाल्ड ब्रेविसला ३ कोटींना विकत घेतलं. याशिवाय मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्डला रिटेन केलं होतं.

कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT