Explainer : Ravindra Jadeja ला फलंदाजीत बढती ही Ajinkya Rahane साठी धोक्याची घंटा?

ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी
Explainer : Ravindra Jadeja ला फलंदाजीत बढती ही Ajinkya Rahane साठी धोक्याची घंटा?

इंग्लंडविरुद्ध ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल आता अखेरच्या दिवशी लागणार आहे. भारताने विजयासाठी ३६८ धावांचं आव्हान दिल्यानंतर इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेरीस एकही विकेट न गमावता ७७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघासाठी या सामन्यात एक गोष्ट चिंतेची ठरली ती म्हणजे उप-कर्णधार अजिंक्य रहाणेचं फॉर्मात नसणं.

टीम इंडियाने या सामन्यात आपल्या बॅटींग लाईनअपमध्ये एक बदल केला. ज्यात अजिंक्य रहाणेच्या जागेवर रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या डावात अजिंक्य अपयशी ठरल्यानंतर आता आगामी कसोटी सामन्यासाठी त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलंय. त्यामुळे जाडेजाला फलंदाजीत बढती देणं ही अजिंक्य रहाणेसाठी धोक्याची घंटा ठरु शकते का याचा आढावा घेऊया.

...तर ही वेळच आली नसती

यात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे अजिंक्य रहाणे फॉर्मात नसल्यामुळे टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला हे बदल करावे लागले. जर अजिंक्य फॉर्मात असता आणि त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरु राहिला असता तर संघात हे बदल करण्याची गरजच भासली नसती. याचाच अर्ध टीम इंडियाचं मॅनेजमेंट आता मधल्या फळीत रहाणेला पर्याय शोधायला लागलं आहे हे नक्की. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी अजिंक्यचं फॉर्मात नसणं हे संघासाठी फारशी चिंताजनक बाब नसल्याचं म्हटलं आहे. पण टीम इंडियात होणारे बदल मात्र वेगळंच चित्र दर्शवत आहेत.

रविंद्र जाडेजाला बढती देण्यामागे झटपट धावा करणं हा एकमेव उद्देष असू शकत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये भारताने हनुमा विहारीच्या आधी पंतला पाठवून धावा जमावल्या होत्या. परंतू चौथ्या क्रमांकावर डावखुऱ्या फलंदाजाला पाठवणं यामागे बॉलर्सची लय बिघडवणं हा संघाचा उद्देश दिसत आहे. या कामासाठी हवेत वळणाऱ्या बॉलवर रहाणेपेक्षा जास्त चांगला खेळू शकेल असा फलंदाज संघाला हवा होता ज्यासाठी जाडेजाची निवड झालेली दिसते.

Explainer : Ravindra Jadeja ला फलंदाजीत बढती ही Ajinkya Rahane साठी धोक्याची घंटा?
...तेवढ्या Ajinkya Rahane च्या समस्या वाढत जातील, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार करावा - झहीर खान

- सध्याच्या घडीला नवीन बॉलवर खेळताना रहाणेपेक्षा जाडेजाचा फॉर्म सर्वोत्तम

सध्याच्या घडीला नवीन बॉलवर खेळताना जाडेजाचा फॉर्म हा अजिंक्य आणि पंतपेक्षाही चांगला आहे यात वाद नाही. २०१८ साली ओव्हल टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात जाडेजाने ८७ धावांची खेळी केल्यानंतर जाडेजाच्या फलंदाजीत अमुलाग्र बदल झाला आहे. फलंदाजीत रविंद्र जाडेजाचं तंत्र, फुटवर्क, बॉलच्या जवळ जाऊन खेळणं अशा अनेक निकषांत रविंद्र जाडेजा उजवा ठरतोय. जाडेजाकडून मधल्या फळीत शतकी खेळी होत नसली तरीही तो मोक्याच्या क्षणी भागीदारी करुन धावा जमवण्यात तरबेज आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मधल्या फळीत रविंद्र जाडेजा हा रहाणे आणि पंतपेक्षा नक्कीच उजवा पर्याय आहे.

कामगिरीत सातत्य नसणं हा अजिंक्य रहाणेच्या कामगिरीतला सर्वात मोठा दोष आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेने विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं चांगलं नेतृत्व केलं. परंतू मेलबर्न कसोटी सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर अजिंक्यकडून एकही मोठी इनिंग खेळली गेली नाही. त्यामुळेच ओव्हल कसोटीत अजिंक्यचं झालेलं डिमोशन हे त्याच्या पुढच्या करिअरसाठी धोक्याचं ठरु शकतो.

Related Stories

No stories found.