ENG vs IND: इंग्लंडविरुद्धचा रद्द झालेला 'तो' पाचवा कसोटी सामना आता 'या' दिवशी होणार!

Ind Vs Eng Test Match: इंग्लंड आणि भारतातील रद्द झालेला पाचवा कसोटी सामना आता पुन्हा एकदा खेळविण्यात येणार आहे.
ENG vs IND: इंग्लंडविरुद्धचा रद्द झालेला 'तो' पाचवा कसोटी सामना आता 'या' दिवशी होणार!
Fifth Test between England and India rescheduled for 1 July 2022 India lead the series 2-1(फाइल फोटो)

Ind Vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात काही महिन्यांपूर्वीच पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्यामधील पाचवा कसोटी सामना हा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला होता. यावरुन इंग्लंडमधील मीडियाने भारतीय संघावर बरीच टीकाही केली होती. मात्र, त्यावेळी रद्द करण्यात आलेला हा कसोटी सामना आता पुन्हा एकदा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये रद्द झालेला हा सामना आता 1 जुलै 2022 रोजी खेळविण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय संघ या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हा सामना एजबॅस्टनमध्ये 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान खेळविण्यात येणार आहे. जो एक प्रकारे या मालिकेचा अंतिम सामना असणार आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी भारतीय संघ मालिका विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र, इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये शेवटचा सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या कॅम्पमधील काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम इंडियाने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यावेळी हा सामना रद्द करण्यात आला होता.

मात्र, तेव्हाच असं स्पष्ट करण्यात आलं होतं की, हा सामना तात्पुरता रद्द करण्यात आला असून लवकरच तो पुन्हा एकदा खेळविण्यात येईल. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दोन्ही क्रिकेट बोर्डाची याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आता त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

'तो' कसोटी सामना का करण्यात आला होता रद्द?

भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना पाचव्या कसोटी सामन्याच्या आधीच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. परमार यांना लागण झाल्याचं समोर आल्यानंतर भारतीय खेळाडूंना विलगीकरणा ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या दोन RT-PCR चाचण्याही करण्यात आल्या होत्या. सर्व खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

पण पाचवा कसोटी सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच इंग्लंड क्रिकेट मंडळ व भारतीय क्रिकेट मंडळाने सहमतीने पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

परमार यांना कोरोना संसर्ग होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिजिओ नितीन पटेल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

ओव्हलमध्ये झालेल्या कसोटी सामन्याच्या दरम्यान रवी शास्त्री हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास असमर्थतता दर्शवली होती. ज्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. पण आता हा सामना 1 जुलै 2022 रोजी खेळविण्यात येणार आहे.

दरम्यान, या कसोटी सामन्याव्यतिरिक्त, भारतीय संघ या दौऱ्यावर टी-20 आणि वनडे मालिका देखील खेळणार आहे. भारताला इंग्लंडमध्ये तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत.

Fifth Test between England and India rescheduled for 1 July 2022 India lead the series 2-1
जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण...England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

जुलै 2022 मध्ये भारताचा इंग्लंड दौरा

  • 1 ते 5 जुलै - (आधीच्या दौऱ्यातील पाचवा कसोटी सामना)

टी-20 मालिका

  • 7 जुलै - पहिला टी -20 सामना

  • 9 जुलै - दुसरा टी -20 सामना

  • 10 जुलै - तिसरा टी -20 सामना

वनडे मालिका

  • 12 जुलै - पहिला वनडे सामना

  • 14 जुलै - दुसरा वनडे सामना

  • 17 जुलै - तिसरा वनडे सामना

Related Stories

No stories found.