Harsha Bhogle: हर्षा भोगलेला अचानक काय झालं?, हा VIDEO पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला, पण...

Harsha Bhogle Video: हर्षा भोगले याचा एक व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यानंतर त्याच्या सगळ्याच चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता.
harsha bhogle online interview camera dropped  fans become scary video goes viral ipl 2022
harsha bhogle online interview camera dropped fans become scary video goes viral ipl 2022

मुंबई: सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले हा एका वेबसाइटला ऑनलाइन मुलाखत देताना अचानक त्याचा मोबाइल खाली पडला आणि त्याच्या रुममध्ये गडबड ऐकू आली. त्यामुळे काही क्षणात अनेक शंका-कुशंका लाखो चाहत्यांच्या मनात निर्माण झाल्या. पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हर्षा भोगले यांच्याबाबतीत काहीही झालेले नाही. तो पूर्णपणे ठीक आहे. काही वेळापूर्वी त्याने स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली होती.

हर्षा भोगले याने ट्विटमध्ये लिहिले आहे, 'मी ठीक आहे. तुम्हा सर्वांना जे काळजीत टाकलं त्यासाठी मी माफी मागतो. प्रेम आणि काळजी (माझ्यासाठी) दाखवल्याबद्दल धन्यवाद. हे एवढं व्हायरल झालं आहे की, मी कल्पनाही करू शकत नाही. हे देखील शिकण्यासारखे आहे. त्याचा उद्देश काही औरच होता. क्षमस्व. आनंदी रहा.'

हर्षाचे हे ट्विट वाचून त्याने लोकांची खिल्ली उडवल्याचे दिसते आहे. तथापि, असं म्हणणं देखील खूप घाईचे आहे. पण तूर्तास हा योगायोग मानूया.

नेमकं काय झालं?

हर्षा भोगलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहून काही लोकांनी हर्षा भोगले यांच्यावर हल्ला केलाय की काय असं वाटत होतं किंवा हर्षा भोगले याला भोवळ वैगरे आली की काय असंही वाटत होतं. त्यामुळे सगळ्यांनाच त्याच्याबाबत चिंता वाटली.

आयपीएलच्या नवीन हंगामाबाबत हर्षा भोगले स्पोर्ट्सवॉकशी बोलत होता. तो नुकताच मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता की अचानक त्याचा फोन खाली पडला. त्यानंतर नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. पाहा या संबंधीचा व्हीडिओ.

हा व्हिडीओ पाहून अनेकांना हर्षा भोगलेबाबत चिंता वाटू लागली. कारण अचानक व्हीडिओ सुरु असताना फोन खाली पडला आणि फोन पडल्यानंतर व्हिडिओमध्ये काहीही दिसत नाही. पण हर्षाचा आवाज ऐकू येत होता. तो घाईघाईत म्हणत होता की, 'काय झालं! तिथे कोण आहे! कुठून आलास!'

harsha bhogle online interview camera dropped  fans become scary video goes viral ipl 2022
IPL 2022 : कशी सुरु आहे Mumbai Indians ची तयारी? पाहा हे खास फोटो

हे ऐकून हर्षाच्या घरात कोणीतरी शिरलं असल्याचं समोर आलं. यानंतर, व्हिडिओच्या मागून काही लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. हे सर्व पाहून मुलाखत घेणारी व्यक्तीही घाबरून जाते. काय झाले ते त्यालाही समजत नाही. क्षणभर त्याला हर्षा भोगलेचा फोन बंद पडल्याचं जाणवतं, पण नंतर त्यालाही कळतं की दुसरीकडे काहीतरी गडबड आहे. यानंतर स्पोर्ट्सवॉकचा हा व्हिडिओ संपतो.

इकडे सोशल मीडियावर हर्षा भोगलेचे काय झाले याची चिंता अनेकांना वाटू लागली. हर्षावर हल्ला झाला की आणखी काही हे स्पष्ट झाले नाही. सोशल मीडियावर तर काही ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचं देखील बोललं गेलं, मात्र ती सर्व माहिती चुकीची निघाली आणि आता हे प्रकरण प्रँक असल्याचं देखील बोललं जात आहे.

तसं पत्रकार सुनंदन लेले यांनी आधीच ट्विट केले होते आणि घाबरण्याचे काहीच नाही असे म्हटले होते. हर्षा भोगले एकदम ठीक आहे. त्याचवेळी हर्षा भोगले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पोर्ट्सवॉकने सांगितले होते. आता कोणाला काही करण्याची गरज नाही, हर्षा ठीक आहे!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in