रिचर्ड्स यांची बोचरी टीका आणि गावसकरांनी झळकावलं शतक - Mumbai Tak - how viv richards help sunil gavaskar to score century - MumbaiTAK
स्पोर्ट्स

रिचर्ड्स यांची बोचरी टीका आणि गावसकरांनी झळकावलं शतक

भारतीय क्रिकेटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले. ७०-८० च्या दशकात सुनिल गावसकर यांनी आपल्या बहारदार शैलीच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला. पूर्वीच्या काळी वेस्ट इंडिजचे बॉलर हे आपल्या भेदक माऱ्यासाठी ओळखले जायचे. परंतू सुनिल गावसकर यांनी आग ओकणाऱ्या या गोलंदाजांचाही हेल्मेट न घालता नेटाने सामना केला होता. ३७ वर्षांपूर्वी गावसकर यांनी क्रिकेटच्या मैदानावर […]

भारतीय क्रिकेटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले. ७०-८० च्या दशकात सुनिल गावसकर यांनी आपल्या बहारदार शैलीच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला. पूर्वीच्या काळी वेस्ट इंडिजचे बॉलर हे आपल्या भेदक माऱ्यासाठी ओळखले जायचे. परंतू सुनिल गावसकर यांनी आग ओकणाऱ्या या गोलंदाजांचाही हेल्मेट न घालता नेटाने सामना केला होता. ३७ वर्षांपूर्वी गावसकर यांनी क्रिकेटच्या मैदानावर एक असा विक्रम केला होता की त्यानंतर २२ वर्ष तो विक्रम मोडणं कोणालाही जमलं नव्हतं. त्या काळात सर डॉन ब्रॅडमन यांचा २९ कसोटी शतकांचा विक्रम हा एका हिमालयाप्रमाणे मानला जायचा. मात्र गावसकर यांनी १९८३-८४ च्या मालिकेत विंडीजविरुद्ध दोन शतकं झळकावली आणि ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला.

१९८३ च्या वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर स्वाभिमानाला धक्का पोहचलेली विंडीजची टीम भारत दौऱ्यावर आली होती. विंडीजच्या संघाने भारतात ५ वन-डे आणि ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळली. पाचही वन-डे सामने जिंकत विंडीजने विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदला घेतला. कसोटी मालिकेतही पहिले ३ सामने जिंकत वेस्ट इंडिजने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. माल्कम मार्शल, मायकल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, क्विंटन डेविस या फास्ट बॉलर्सनी भारतीय फलंदाजांना चांगलंच अडचणीत टाकलं.

या कसोटी मालिकेतला अंतिम सामना २४ डिसेंबरला चेन्नईत (तेव्हांचं मद्रास) खेळवण्यात येणार होता. विंडीजचे कर्णधार क्वाईड लॉइड यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या अडीच दिवसांच्या खेळात फारकाही घडलं नाही. ठराविक अंतराने विंडीजचे फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे संघ कोलमडला. अखेरच्या फळीतल्या बॅट्समननी थोडीफार झुंज देत विंडीजला ३१३ रन्सपर्यंत मजल मारुन दिली. तिसऱ्या दिवशी जेव्हा भारताला फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा सलामीला अंशुमन गायकवाड आणि नवज्योतसिंह सिद्धू बॅटींगला आले. सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच गायकवाड आणि सिद्धू आऊट झाल्यामुळे अखेरीस गावसकर यांना लवकर मैदानात यावं लागलं. यावेळी गावसकर बॅटींग करत असताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रिचर्ड्स यांनी गावसकरांना खिजवण्यासाठी, नो माता, नो माता तु विकेत्स गॉन बत योर स्कोर इज स्टिल झिरो (No Matter, no matter two wickets gone but your score is still zero) असं म्हणत डिवचलं. गावसकरांना रिचर्ड्स यांचा हा टोमणा फार जिव्हारी लागला आणि त्यादिवशी काही झालं तर वेस्ट इंडिजला विकेट द्यायची नाही हे त्यांनी ठरवलं. दिवसाअखेरीस भारताने ४ विकेट्स गमावत ६९ पर्यंत मजल मारली. गावसकरांची साथ देण्यासाठी त्यावेळी मैदानात नाईट वॉचमन शिवलाल यादव होते.

यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त २ विकेट्स गमावत १९३ रन्स केले. रवी शास्त्री यांनी गावसकरांना चांगली साथ देत ७२ धावा केल्या. लंच सेशननंतर गावसकर यांनी आपलं तिसावं शतक पूर्ण करत ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला. या खेळीसह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गावसकरांचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं गेलं. यानंतर तब्बल २२ वर्ष हा विक्रम गावसकरांच्या नावावर जमा होता. २००५ साली सचिन तेंडुलकरने हा विक्रम आपल्या नावावर जमा केला. यानंतर पाचव्या दिवशी गावसकांनी आपल्या खेळाची गती वाढवत धावा जमवण्यास सुरुवात केली. टी ब्रेक झाल्यानंतर कर्णधार कपिलने भारताचा डाव घोषित केला. यावेळी भारताचा स्कोअर होता ८ बाद ४५१ रन्स. सुनिल गावसकर नाबाद २३६ तर सय्यद किरमाणी यांनी नाबाद ६३ रन्सची खेळी केली. यानंतर हा कसोटी सामना फक्त औपचारिकता म्हणून बाकी राहिला होता. टी ब्रेकनंतर वेस्ट इंडिजने १ विकेट गमावत ६४ रन्स केल्या. यानंतर कपिल देव आणि लॉईड यांच्या सहमतीने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + nine =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे