ICC Tournaments: Pakistan मध्ये तब्बल 3 दशकानंतर ICC इव्हेंट, भारतात कधी असणार पुढचा वर्ल्डकप?

ICC World Cup Venues: आयसीसीने 2031 पर्यंतचे आपले सर्व इव्हेंट आणि विश्वचषक कोणकोणत्या देशात कधी-कधी होणार हे जाहीर केलं आहे.
icc events t20 one day world cup champions trophy tournament hosts confirmed pakistan india dates
icc events t20 one day world cup champions trophy tournament hosts confirmed pakistan india dates(फोटो सौजन्य: Getty)

ICC World Cup Venues: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुढील 10 वर्षातील सर्व प्रमुख स्पर्धांचे आयोजक कोण असतील हे जाहीर केलं आहे. खास बाब म्हणजे जवळपास 3 दशकांनंतर पाकिस्तान हे आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दहशतवाद्यांचं सावट कायम असल्याने मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट फारसं झालेलंच नाही. नुकतंच पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघाने देखील ऐन सामन्याच्या दिवशी दौरा रद्द केला होता. अशावेळी आता आयसीसीकडून 2025 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला यजमानपद दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

1996 नंतर म्हणजेच 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच ICC स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. 1996 मध्ये पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेसोबत मिळून वनडे विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी श्रीलंकेने हा विश्वचषक जिंकला होता.

आयसीसीने जे वेळापत्रक जाहीर केलं त्यानुसार 2024 चा टी-20 विश्वचषक हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. अमेरिकेत प्रथमच क्रिकेटचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर 2026 चा T20 विश्वचषक हा भारतात होणार आहे.

केव्हा आणि कुठे होणार आहेत आयसीसी स्पर्धा?

• जून 2024 (T-20 विश्वचषक) – अमेरिका, वेस्ट इंडिज

• फेब्रुवारी 2025 (चॅम्पियन्स ट्रॉफी) - पाकिस्तान

• फेब्रुवारी 2026 (T-20 विश्वचषक) - भारत, श्रीलंका

• ऑक्टोबर 2027 (वनडे विश्वचषक) - दक्षिण आफ्रिका, नामिबिया

• ऑक्टोबर 2028 (T-20 विश्वचषक) - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड

• ऑक्टोबर 2029 (चॅम्पियन्स ट्रॉफी) - भारत

• जून 2030 (T-20 विश्वचषक) - इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड

• ऑक्टोबर 2031 (वनडे विश्वचषक) - भारत, बांगलादेश

दरम्यान, नुकताच एक ICC T-20 विश्वचषक संपन्न झाला आहे. ज्याचं जेतेपद हे ऑस्ट्रेलियाने पटकावलं आहे. या स्पर्धेचं अधिकृत यजमानपद हे भारताकडे होतं. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये भरविण्यात आली. तर 2022 चा T-20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात होणार आहे. तर 2023 चा वनडे विश्वचषक हा भारतातच होणार आहे.

icc events t20 one day world cup champions trophy tournament hosts confirmed pakistan india dates
T20 WC, Aus Vs Pak: ...म्हणून पाकिस्तान हरलं, 'त्या' एका बॉलने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं!

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 2022 ते 2031 दरम्यान एकूण 5 टी-20 विश्वचषक होणार आहेत. आयसीसीने आधीच स्पष्ट केलं आहे की, दर दोन वर्षांनी T-20 विश्वचषकाचं आयोजन केलं जाईल. खरं तर भारतात 2020 मध्येच T-20 विश्वचषक स्पर्धा होणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 2021 साली याचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in