ICC T20 Rankings: क्रमवारीत पाकिस्तानच्या फलंदाजांचा डंका, जाणून घ्या भारतीयांची काय स्थिती?

आयसीसीने टी-20 फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे.
ICC T20 Rankings: क्रमवारीत पाकिस्तानच्या फलंदाजांचा डंका, जाणून घ्या भारतीयांची काय स्थिती?

आयसीसीने टी-20 फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. नवीन रँकिंगमध्ये बाबर आझमच्या जागा सूर्यकुमार यादव घेईल असं वाटलं होत. पण, या दोघांच्या लढतीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रिझवान आता T20 मध्ये नवा नंबर वन फलंदाज आहे. त्याने आपलाच सलामीचा जोडीदार बाबर आझमला मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. याआधी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. नव्या क्रमवारीत सूर्यकुमार यादवलाही चांगलाच फटकाबसला आहे.

आशिया चषकात किंवा त्याआधी खेळलेल्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध ज्या प्रकारची कामगिरी केली होती, त्यामुळे तो बाबर आझमची जागा घेऊ शकेल, अशी अपेक्षा होती. मात्र केवळ सूर्यकुमार यादवच नाही तर बाबर आझमही आशिया कपमध्ये अपयशी ठरला. त्यांच्या अपयशाच्या वेळी, मोहम्मद रिझवानने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याचा परिणाम आयसीसीच्या नवीन टी-20 क्रमवारीवर झाला आहे.

बाबर आझम आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही नवीन T20 क्रमवारीत 1-1 स्थान गमवावे लागले आहे. बाबर आझम नंबर वन वरून नंबर टू बनला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव नव्या रँकिंगमध्ये टॉप 3 मधून बाहेर पडला आहे. तो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामने सूर्यकुमार यादवला मागे टाकत टी-20 क्रमवारीत तिसरे स्थान गाठले आहे.

ICC च्या नवीन T20 क्रमवारीतील पहिल्या 5 यादीत पाकिस्तानचे 2 फलंदाज आहेत, तर भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे 1-1 फलंदाज आहेत. गोलंदाजांच्या T20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोस हेझलवूड पहिल्या स्थानावर आहे. तर टॉप 10 मध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारताचा हार्दिक पंड्या पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in