तुमच्या खेळाडूंचा आदर करा ! शमीला ट्रोल करणाऱ्यांना पाकिस्तानी खेळाडूनेही सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तब्बल दोन वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर आलेल्या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना कमालीचा एकतर्फी झाला. रविवारी दुबईच्या मैदानावर पाकिस्तानने भारतावर १० विकेट राखून दणदणीत मात केली. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर चाहते नाराज झाले असून संघाच्या कामगिरीवर टीका केली जात आहे. ही टीका करत असताना काही जणांनी मोहम्मद शमीच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेविषयी प्रश्न विचारले आहेत.

अनेकांनी मोहम्मद शमीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर जाऊन त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अशावेळी पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझवान शमीच्या बचावासाठी धावून आलाय. रिझवानने आपल्या ट्विटरवर शमीला पाठींबा देणारी पोस्ट लिहली आहे.

आपल्या देशाकडून खेळताना खेळाडूवर दडपण, लोकांकडून असणाऱ्या अपेक्षांचं ओझं आणि त्याचा खडतर प्रवास हा शब्दात न मांडता येण्यासारखा आहे. मोहम्मद शमी हा जगातला एक सर्वोत्तम बॉलर आहे. कृपया आपल्या खेळाडूंचा आदर करा, या खेळामुळे लोकं एकत्र यायला हवीत, ती दुरावता कमा नयेत असं मत रिझवानने मांडलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !

मोहम्मद रिझवानने भारताविरुद्ध सामन्यात महत्वाची शतकी भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रिझवानने मोहम्मद शमीसह बुमराह, भुवनेश्वर या भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना करत चौफेर फटकेबाजी केली. रिझवानने ५५ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत ७९ रन्सची इनिंग खेळली.

ADVERTISEMENT

मुलगी तापाने फणफणत असतानाही शमी मैदानात उतरला, ६ विकेट घेत संघाला सामना जिंकवून दिला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT