
ICC ने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश हे संघ सुपर 12 मध्ये आहेत. श्रीलंका, नामिबिया, वेस्टइंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी समोरासमोर भिडतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.
आयसीसीने शुक्रवारी सकाळी नवीन शेड्युलड जारी केलं. टी-20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सुपर-12 राऊंडची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या लढती
– भारत विरुद्ध पाकिस्तान 23 ऑक्टोबर – मेलबर्न
– भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप 27 ऑक्टोबर – सिडनी
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर – पर्थ
– भारत विरुद्ध बांगलादेश 2 नोव्हेंबर – एडिलेड
– भारत विरुद्ध ग्रुप बी विनर 6 नोव्हेंबर – मेलबर्न
टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर टीमसोबत ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे. टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. यावेळी पाकिस्तानने दहा विकेटने भारतावर विजय मिळवला होता. त्यावेळी वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.
T20 विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. फायनलचा सामना 12 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. तर, उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड ओव्हल येथे होणार आहेत.
त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांसाठी तिकिटांची विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात करोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेचा हा आठवा हंगामअसेल. ICC T20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे.