Ind Vs Aus, 2nd ODi: रोहित शर्मा संघात परतल्यास ‘या’ खेळाडूला जावं लागणार बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ind vs Aus One Day Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 19 मार्च (रविवार) रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच गडी राखून शानदार विजय मिळविला होता, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. (If Rohit Sharma returns, this player will have to sit out of the team)

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-11 मधून कोणता खेळाडू बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांना दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागेल, असे दिसते. तसे सूर्या बाहेर बसण्याची अधिक शक्यता आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरत आहे. असं असलं तरी, इशान किशन मधल्या फळीतही फलंदाजीत माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा नसणार कर्णधार; सुनील गावस्करांचं मोठं विधान

तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आलं नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कच्या हातून एलबीडब्ल्यू आऊट झाला. तसे, सलामीवीर इशान किशनची कामगिरीही निराशाजनक होती. तीन धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर इशानला मार्कस स्टॉइनिसने एलबीडब्ल्यू आऊट केले.

ADVERTISEMENT

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचा फॉर्म खराब आहे

ADVERTISEMENT

सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे, पण 50 षटकांचा फॉरमॅट त्याच्यासाठी काही खास ठरत नाहीये. सूर्याने आतापर्यंत 21 एकदिवसीय सामन्यांच्या 19 डावांमध्ये 27.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या 10 डावांमध्ये सूर्याला केवळ चार वेळा दुहेरी आकडा गाठता आला, यावरूनच त्याची खराब कामगिरी स्पष्ट होते.

…अन् विराट कोहलीसाठी सूर्यकुमार बनला फोटोग्राफर, बघा काय घडलं?

सूर्यकुमारची शेवटची 10 एकदिवसीय खेळी

13 धावा वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन

9 धावा वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन

8 धावा वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन

4 धावा विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड

34* धावा विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन

6 धावा विरुद्ध न्यूझीलंड, क्राइस्टचर्च

4 धावा विरुद्ध श्रीलंका, तिरुवनंतपुरम

31 धावा विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद

14 धावा विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर

0 धावा वि ऑस्ट्रेलिया, मुंबई

ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्सने सांगितला T20तील बेस्ट खेळाडू

    follow whatsapp

    ADVERTISEMENT