सतत मास्क घालून वावरणं अशक्य! Corona positive पंतची सौरव गांगुलीकडून पाठराखण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला यंदा मालिकेला सुरुवात होण्याआधीच अडचणीचा सामना करावा लागतो आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. WTC Final सामना खेळल्यानंतर BCCI ने भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली होती. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी युरो कप, विम्बल्डन स्पर्धेचा आनंद घेतला. परंतू पंतला कोरोनाची लागण झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते बीसीसीआयच्या आयोजनाबद्दल प्रश्न विचारत आहेत.

परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. “सतत मास्क घालून वावरणं हे शक्य होणार नाही. आपण सर्वांनी युरो कप आणि विम्बल्डनचे सामने पाहिले. गर्दीच्या बाबतीत या स्पर्धांमध्येही नियम बदलण्यात आले. भारतीय खेळाडू हे सुट्टीवर होते. त्यामुळे बाहेर असताना सतत मास्क घालून वावरणं शक्य होत नाही”, अशा शब्दांमध्ये सौरव गांगुलीने पंतची पाठराखण केली.

सुट्टीदरम्यान ऋषभ पंत युरो कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध जर्मनी सामना पाहण्यासाठी Wembley Stadium मध्ये गेला होता. यावेळी आपल्या मित्रांसोबत सामना पाहतानाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले बॉलिंग कोच भारत अरुण, वृद्धीमान साहा आणि अभिमन्यु इश्वरन यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. टीम इंडिया Durham मध्ये तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी पंत आणि इतर सदस्य सहभागी होऊ शकणार नाहीयेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT