Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय - Mumbai Tak - ind vs aus 2nd odi australia won bye 10 wicket against india mitchell marsh travis head half century mitchell starc taken 5 wicket - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय

India vs Australia 2nd Odi : ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरूद्धचा दुसरा वनडे सामना 10 विकेट्सने जिंकला आहे. ट्रेविस हेड (travis head)आणि मिचेश मार्शच्या (mitchell marsh)नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टी20 स्टाईल हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अर्धशतकी खेळी करणारा मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क (mitchell starc) ठरला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत1-1 ने […]

India vs Australia 2nd Odi : ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरूद्धचा दुसरा वनडे सामना 10 विकेट्सने जिंकला आहे. ट्रेविस हेड (travis head)आणि मिचेश मार्शच्या (mitchell marsh)नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टी20 स्टाईल हा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अर्धशतकी खेळी करणारा मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क (mitchell starc) ठरला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत1-1 ने बरोबरी साधलीय.(ind vs aus 2nd odi australia won bye 10 wicket against india mitchell marsh travis head half century mitchell starc taken 5 wicket)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथेन टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तर टीम इंडियाची प्रथम फलंदाजी होती. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि शुबमन गिल सलामीला उतरला होता. मात्र टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. शुबमन गिल शु्न्यावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गिलनंतर लगेचच रोहित शर्मा आऊट झाला. रोहित शर्मा 13 धावा करून बाद झाला. रोहितनंतर मैदानात उतरलेला सुर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकचा शिकार ठरला.

India Today Conclave : ‘वनडे क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी…’,सचिन तेंडुलकरने सांगितला प्लान

विराट कोहली एका बाजूने भक्कमपणे फलंदाजी करत असताना, दुसऱ्या बाजूने एका मागून एक विकेट पडत होते. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या (mitchell starc) भेदक गोलंदाजीसमोर कोणत्याच खेळाडूचा निभाव लागत नव्हता. सुर्यानंतर रविंद्र जडेजा 16 धावा करून आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली देखील 31 धावा करून आऊट झाला.

BCCI चा अध्यक्ष व्हायचं का? सचिन तेंडुलकरने
दिलं इंटरेस्टिंग उत्तर

विराटनंतर अक्षर पटेल मैदानात जम बसवत असताना देखील विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच होता. कुलदीप यादव 4, मोहम्मद शमी आणि सिराज शुन्य धावा करून आऊट झाले.शेवटी अक्षर पटेल 29 धावावर नाबाद राहिला. या धावांच्या बळावर टीम इंडियाने कसे बसे 100 चा आकडा गाठत ऑस्ट्रेलियासमोर 117 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 5, सीन अबॉटने 3 तर नथन इलिसने 3 विकेट घेतले.

Ind vs Aus 1st Odi : मायदेशात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड, आकडे काय सांगतात?

ऑस्ट्रेलिया 118 धावांचे आव्हान

टीम इंडियाने दिलेले 118 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज 11 ओव्हरमध्ये गाठले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने 51 धावा आणि मिचेल मार्शने 63 धावा ठोकल्या.या दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टी20 स्टाईल विजय साजरा केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने (Australia) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1ने बरोबरी साधली.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…