२०२१ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु होण्याचे संकेत

पाकिस्तानी वृत्तपत्राची माहिती, वर्षाच्या मध्यावधीत ३ टी-२० सामने खेळवले जाऊ शकतात
२०२१ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु होण्याचे संकेत
फोटो सौजन्य - इंडिया टुडे

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका गेली अनेक वर्ष बंद आहे. २००७ साली पाकिस्तानचा संघ भारतात टेस्ट सिरीज खेळण्यासाठी शेवटचा आला होता, यावेळी दोन्ही संघांमध्ये ५ वन-डे आणि ३ टेस्ट मॅच खेळवल्या गेल्या. यानंतर २०१३ मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात लिमीटेड ओव्हर्सची सिरीज खेळण्यासाठी आला. यानंतर दोन्ही देशांतील तणावाच्या वातावरणामुळे क्रिकेटचे सामने खेळवलेच गेले नाही.

२००८ साली भारताचा संघ आशिया कपसाठी शेवटचा पाकिस्तानात गेला होता. गेल्या काही वर्षांत आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता, भारत आणि पाकिस्तान संघ क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर आलेले नाहीयेत. परंतू नवीन वर्षात दोन्ही संघांमधील क्रिकेट सिरीज पुन्हा एकदा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानमधील Daily Jung या उर्दु वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दोन्ही संघांमध्ये क्रिकेट सिरीज खेळवता येईल का याची चाचपणी सुरु झाली आहे.

आम्हाला तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर Daily Jung या वृत्तपत्राला ही माहिती दिली. जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० मॅचची सिरीज खेळवण्यासाठी ६ दिवसांची एक विंडो तयार करण्यात येईल. या वर्षाच्या मध्यावधीनंतर ही सिरीज खेळवली जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी भारतासोबत क्रिकेट मालिका सुरु करण्याबाबत सकारात्मक विधान केलं होतं. २०२३ मध्ये एशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल अशी आम्हाला आशा आहे.

२०२३ मध्ये आशिया चषकाचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला तर पाकिस्तानी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून ही महत्वाची बाब ठरेल. तोपर्यंत दोन्ही देशांमधलं राजकीय वातावरण सुधारेल असं एहसान मणी यांनी एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in