भारताचा इंग्लंडला ‘दे धक्का’, ८ रन्सनी जिंकली मॅच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ रन्सनी मात करत भारतीय संघाने टी-२० सिरीजमध्ये २-२ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडला विजयासाठी भारताने १८६ रन्सचं टार्गेट दिलं होतं. शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि इतर भारतीय बॉलर्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला १७७ रन्सवरच रोखलं. इंग्लंडकडून जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी चांगले प्रयत्न केले. परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय बॉलर्सनी चांगलं कमबॅक करत इंग्लंडला धक्का दिला.

Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात

टीम इंडियाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ड्वाइड मलान आणि जेसन रॉय यांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशीप केली. चहरने मलाना क्लिनबोल्ड करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने हार्दिक पांड्याने धोकादायक ठरु पाहणाऱ्या जेसन रॉयलाही माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या बॉलर्सना घाम फोडला. राहुल चहरने पुन्हा एकदा आपली भूमिका चोख बजावत बेअरस्टोला माघारी धाडलं. शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये बेन स्टोक्स आणि ओएन मॉर्गनला आऊट करत इंग्लंडला आणखीनच बॅकफूटला ढकललं. जोफ्रा आर्चरने अखेरपर्यंतक मैदानावर टिकून फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतू त्याला अपयश आलं. यानंतर इंग्लंडचा संघ कमबॅक करु शकला नाही, आणि भारतीय संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ind vs Eng : अहमदाबादमध्ये मुंबईचा ‘सूर्य’तळपला, टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंच्युरी

त्याआधी, टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन ओएन मॉर्गनने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. परंतू जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर रोहित स्वस्तात आऊट झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराटने सूर्यकुमार यादवला बढती दिली. सूर्यकुमार – लोकेश राहुल जोडी मैदानावर टिकतेय असं वाटत असतानाच स्टोक्सने राहुलची विकेट घेतली. यानंतर कॅप्टन विराट कोहलीही आदिल रशिदच्या बॉलिंगवर स्टम्प आऊट झाला. यानंतर सूर्यकुमारने ऋषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दरम्यान सूर्यकुमारने आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतकही साजरं केलं. सॅम करनच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवला थर्ड अंपायरनी वादग्रस्त पद्धतीने आऊट दिलं. सूर्यकुमारने ३१ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत ५७ रन्स केल्या.

ADVERTISEMENT

सूर्यकुमार Out की Not Out? अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलमुळे नेटकरी भडकले

ADVERTISEMENT

यानंतर ठराविक अंतराने ऋषभ पंतही आऊट झाला. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर यांनी फटकेबाजी करत भारतीय संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. श्रेयस अय्यरने ३७ तर ऋषभ पंतने ३० रन्स केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ४ तर आदिल रशिद-मार्क वुड-बेन स्टोक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

मोक्याच्या क्षणी विराट कोहली फेल, टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी घटना

    follow whatsapp

    ADVERTISEMENT