Hockey Asia Cup : आशिया कप स्पर्धेत भारताची सुपर-४ मध्ये धडक, इंडोनेशियाचा उडवला धुव्वा

भारताचा इंडोनेशियावर १६-० असा दणदणीत विजय, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Hockey Asia Cup : आशिया कप स्पर्धेत भारताची सुपर-४ मध्ये धडक, इंडोनेशियाचा उडवला धुव्वा

Hockey Asia Cup 2022 : हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताने इंडोनेशियाचा अक्षरशः धुव्वा उडवला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा १६-० अशा फरकाने पराभव करत सुपर-४ मध्ये धडक दिली.

हॉकी आशिया कपमध्ये भारताने इंडोनेशियाचा १६-० असा पराभव करत जबरदस्त विजयाची नोंद केली. विशेष बाब म्हणजे भारताच्या या विजयाबरोबरच पाकिस्तानच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान विश्वचषक २०२३ मधून बाहेर गेला आहे.

आशिया कप स्पर्धेच्या नॉकआउटमध्ये जागा मिळवण्यासाठी भारताला एका मोठ्या विजयाची गरज होती. टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत १६-० अशा विजयाची नोंद केली. भारताने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सुरूवातीपासून इंडोनेशियावर दबाव बनवला.

पहिल्या क्वार्टरमध्ये गोल केल्यानंतर टीम इंडियाने खेळाची गती वाढवली आणि गोलचा धडाकाच लावला. टीम इंडियाने पहिल्या क्वार्टरमध्ये ३-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही टीम इंडियाने इंडोनेशियावर दबाव कायम ठेवत आणखी ३ गोलची भरत घातली आणि दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटी ६-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या राऊंडनंतर भारत १०-० असा आघाडीवर होता. अखेरपर्यंत इंडोनेशियाला एकही गोल करता आला नाही आणि टीम इंडियाने १६-० अशा फरकाने मोठा विजय मिळवला.

या सामन्यातील निकालाचा परिणाम २०२३ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकावरही झाला आहे. कारण मोठ्या फरकाने सामना जिंकणारा संघ पात्र ठरणार होता. आता भारताने विजय मिळवला असून, आता विश्वचषकासाठीही पात्र ठरला आहे. तर पाकिस्तान बाहेर गेला आहे.

भारताबरोबरच जपान, कोरिया आणि मलेशियाही हॉकी विश्वचषकासाठी पात्रता फेरीत दाखल झाले आहेत. दरम्यान आशिया कपबद्दल सांगायचं झाल्यास भारत आणि जपानने स्पर्धेत क्वालिफाय केलं आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेत जपानचे ९ गुण आहेत, तर भारताचे ४ गुण आहेत. भारताने आशिया कपमध्ये आतापर्यंत १९ गोल्स केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in