ICC Women's World Cup : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी मिथाली राजकडे संघाचं नेतृत्व

न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यासाठीही भारतीय महिलांचा संघ घोषित, १ टी-२० आणि ५ वन-डे सामने खेळणार
ICC Women's World Cup : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी मिथाली राजकडे संघाचं नेतृत्व

आगामी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात महिलांचा विश्वचषक न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये १ टी-२० आणि ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्याआधी न्यूझीलंडचा दौरा भारतीय महिला संघासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हे अनुभवी मिथाली राजकडे सोपवण्यात आलं असून ६ मार्चला भारतीय महिला संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिका आणि विश्वचषकासाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ -

मिथाली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दिप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेहा राणा, झुलन गोस्वामी, पुजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव

राखीव खेळाडू - एस. मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादुर

विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचं वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - ६ मार्च - (बे ओव्हल)

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड - १० मार्च - (सेडॉन पार्क, हॅमिल्टन)

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - १२ मार्च - (सेडॉन पार्क, हॅमिल्टन)

  • भारत विरुद्ध इंग्लंड - १६ मार्च - (बे ओव्हल)

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १९ मार्च - (एडन पार्क, ऑकलंड)

  • भारत विरुद्ध बांगलादेश - २२ मार्च - (सेडॉन पार्क, हॅमिल्टन)

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - २७ मार्च - (ख्राईस्टचर्च)

याव्यतिरीक्त न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून हरमनप्रीत कौरकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. या सामन्यासाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेहा राणा, पुजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पुनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना, सिमरन दिल बहादूर

ICC Women's World Cup : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी मिथाली राजकडे संघाचं नेतृत्व
अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस आहेत या महिला क्रिकेटर्स

९ फेब्रुवारीला नेपिअर येथे हा एकमेव टी-२० सामना खेळवला जाणार असून यानंतरचे ५ वन-डे सामने ११ ते २४ फेब्रुवारीदरम्यान नेपिअर, नेल्सन आणि क्विन्सटाऊन येथे खेळवले जाणार आहेत.

ICC Women's World Cup : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी मिथाली राजकडे संघाचं नेतृत्व
Omicron ची भीती, BCCI ने रणजी ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलली

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in