Hardik Pandya: 'घड्याळांची किंमत 5 कोटी नाही तर...' एअरपोर्टवर काय घडलं ते हार्दिकने स्वत: सांगितलं!

Hardik Pandya Watch: क्रिकेटर हार्दिक पांड्याने याने आता आपल्याजवळील कोट्यवधी रुपये किंमतीच्या घड्याळांबाबत नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं आहे.
Hardik Pandya: 'घड्याळांची किंमत 5 कोटी नाही तर...' एअरपोर्टवर काय घडलं ते हार्दिकने स्वत: सांगितलं!
indian cricketer hardik pandya explanation tweet watch real price custom duty mumbai airport(फाइल फोटो)

Hardik Pandya Watch: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मुंबई विमानतळावरील घड्याळ जप्त केल्याच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी सकाळी हार्दिक पांड्याने ट्विट केले की, जेव्हा तो दुबईहून परत येत होता, तेव्हा त्याने स्वत: जाऊन आपले घड्याळ कस्टम अधिकाऱ्यांना दिले होते.

हार्दिकने इतर सर्व आरोप फेटाळून लावले असून आवश्यक ती कागदपत्रे सीमाशुल्क अधिकार्‍यांना सोपवले असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर जो दावा केला जात आहे की, या घड्याळाची किंमत 5 कोटी रुपये आहे तर तसं नसून 1.5 कोटी रुपये असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

हार्दिक पांड्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, '15 नोव्हेंबरला सकाळी दुबईहून परतत असताना माझी बॅग घेऊन मी स्वतः मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर गेलो आणि तिथून आणलेल्या सर्व वस्तू काउंटरवर दाखवल्या आणि त्याची कस्टम ड्यूटीही भरली. सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्यामुळे या सर्व गोष्टींबाबत योग्य काय आहे ते मी सांगत आहे.'

हार्दिकने पुढे असं म्हटलं आहे की, 'मी दुबईतून ज्या खरेदी केलेल्या वस्तू होत्या, त्याबाबत मी स्वत: माहिती दिली. त्यासंबंधी कस्टम ड्यूटी भरण्यास देखील मी तयार होतो. सीमाशुल्क विभागाने सर्व आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत, जे आम्ही देत ​​आहोत. सीमाशुल्क विभाग सध्या नेमकं किती शुल्क असेल याचा हिशोब करत आहे. जे मी भरण्यास तयार आहे. तसेच घड्याळाची किंमत 5 कोटी नाही तर दीड कोटी आहे.

हार्दिक पांड्याने आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, 'मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, मी सर्व सरकारी यंत्रणांचा आदर करतो. जे काही कागद हवे असतील ते मी सीमाशुल्क विभागाला देण्यास तयार आहे, माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत.'

सोमवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याकडून 5 कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. हार्दिक पांड्याची ही घड्याळे सीमाशुल्क विभागाने जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. 2020 मध्येही हार्दिक पांड्याचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पांड्याकडून विमानतळावर विदेशी घड्याळे जप्त करण्यात आली होती.

indian cricketer hardik pandya explanation tweet watch real price custom duty mumbai airport
Hardik Pandya : हार्दिक पंड्याजवळची 5 कोटींची दोन घड्याळं जप्त; मुंबई विमानतळावर कारवाई

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जर तुम्ही परदेशातून कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी सीमा शुल्क भरावे लागते. बाहेरून आल्यावर त्या सामानाशी संबंधित सर्व माहिती विमानतळावरच द्यावी लागते. ज्यामध्ये त्यांची बिले आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश असतो. या आधारावर कस्टम ड्युटी निश्चित केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in