Champions Trophy साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...

२०२५ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे, भारत सरकारची आस्ते कदम भूमिका
Champions Trophy साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...

आयसीसीने नुकतेच आगामी टी-२० वर्ल्डकप, चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वन-डे विश्वचषकाच्या यजमानपदाचे हक्क ठराविक देशांना बहाल केले आहेत. भारताच्या वाटेला २०२६ चा टी-२० विश्वचषक, २०२९ ची चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि २०३१ चा वन-डे विश्वचषकाचं यजमानपद आलं आहे.

याचवेळी भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडे २०२५ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद देण्यात आलेलं आहे.

आयसीसीच्या या निर्णयानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही यावरुन आताच चर्चांना उधाण आलं आहे. भारताचे क्रीडामंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबद्दलची महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.

Champions Trophy साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...
बाबा खूप कठोर वागतात, त्यांना दूर घेऊन जा ! आणि द्रविड भारताचा कोच बनला...गांगुलीने सांगितला किस्सा

"भारत सरकार त्या दरम्यान पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेईल. यानंतरच भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी होईल की नाही यावर निर्णय घेण्यात येईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने याआधीही अनेकदा असे निर्णय घेतले आहेत. एखादी जागतिक स्पर्धा आयोजित करत असताना अनेक घटक कारणीभूत ठरतात. याआधीही अनेक देशांनी पाकिस्तानमधली परिस्थिती योग्य नसल्यामुळे माघार घेतलेली आहे."

सुरक्षा व्यवस्था हे सर्वात महत्वाचं कारण आहे. याआधी तिकडे संघावर हल्ला झालेला आहे ही काळजीची गोष्ट आहे. त्यामुळे ज्यावेळेला ती वेळ येईल तेव्हा भारत सरकार तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुढील 10 वर्षातील सर्व प्रमुख स्पर्धांचे आयोजक कोण असतील हे जाहीर केलं आहे. खास बाब म्हणजे जवळपास 3 दशकांनंतर पाकिस्तान हे आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. दहशतवाद्यांचं सावट कायम असल्याने मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट फारसं झालेलंच नाही. नुकतंच पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघाने देखील ऐन सामन्याच्या दिवशी दौरा रद्द केला होता. अशावेळी आता आयसीसीकडून 2025 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला यजमानपद दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Champions Trophy साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणतात...
ICC Tournaments: Pakistan मध्ये तब्बल 3 दशकानंतर ICC इव्हेंट, भारतात कधी असणार पुढचा वर्ल्डकप?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in