Mumbai Tak /बातम्या / WTC Final: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, आकडेवारी काय सांगते?
बातम्या स्पोर्ट्स

WTC Final: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, आकडेवारी काय सांगते?

World test championship Final : बॉर्डर-गावस्कर मालिका (Border Gavaskar Series) सुरू होण्यापूर्वी भारतातील सर्व काही पणाला लागले होते. निमित्त होते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. टीम इंडियाला माहीत होतं की जर टीम बॉर्डर गावस्कर मालिका हरली तर टीम कधीच wtc च्या फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही. पण पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने हे सिद्ध केले की तोच wtc फायनलचा सर्वात मोठा दावेदार आहे. आता भारताला इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनला फायनल सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. (India’s record on the ground where the WTC final will be played is scary)

चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला आणि भारत फायनलमध्ये पोहचला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण शेवटी सर्व काही या दोन्ही संघांच्या निकालावर अवलंबून होते आणि न्यूझीलंडने कुठेतरी जिंकून भारतासाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडले. पण या सगळ्यात फायनलपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली आहे. कारण ज्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाला टक्कर द्यावी लागेल त्या मैदानावरील भारताचा विक्रम भीतीदायक आहे.

ओव्हलवर टीम इंडिया विजयासाठी आसुसलेली

ओव्हलच्या मैदानावर जेव्हा जेव्हा टीम इंडिया सामन्यासाठी बाहेर पडते तेव्हा संघाच्या विजयी रथाला लगाम मिळतो. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारताचा विक्रम खूपच खराब आहे. सन 1936 ते 2021 पर्यंत भारताने या मैदानावर एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने फक्त दोनच सामने जिंकले आहेत. याशिवाय संघाने 5 सामने गमावले असून 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने या मैदानावर एकूण 24 डाव खेळले आहेत ज्यात सर्वोच्च धावसंख्या 664 आणि सर्वात कमी धावसंख्या 94 आहे.

WTC 2023: टीम इंडियाला लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट कन्फर्म

टीम इंडियाचा wtc फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला होता

अशा परिस्थितीत भारताला या मैदानावर कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे, याची ही आकडेवारी साक्षीदार आहे. कारण गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. हा सामनाही इंग्लंडमध्ये पण साउथम्प्टनच्या मैदानावर झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने प्रथम इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. यानंतर टीम इंडियाचा पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत पराभव झाला. मात्र, त्यानंतर भारताने न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी रणनीती आखली आणि अखेर या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सेलिब्रेशन व्हायलाच हवं ना! ऑस्कर मिळवणाऱ्या ‘नाटू नाटू’च्या तालावर थिरकली टीम इंडिया

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान