#INDwithHasanAli सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये, वेडचा कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर पाक चाहते भडकले

टी-२० विश्वचषकातलं पाकिस्तानचं आव्हान अखेरीस संपुष्टात, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
#INDwithHasanAli सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये, वेडचा कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर पाक चाहते भडकले

टी-२० विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून धडाकेबाज विजयी सुरुवात केलेल्या पाकिस्तानी संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ५ विकेट राखून मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅथ्यू वेडने १९ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीच्या बॉलिंगवर अखेरच्या ३ चेंडूत ३ खणखणीत षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

याच षटकात पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यामुळे हातात आलेली एक मोलाची संधी पाकिस्तानला गमवावी लागली.

#INDwithHasanAli सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये, वेडचा कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर पाक चाहते भडकले
T20 WC, Aus Vs Pak: ...म्हणून पाकिस्तान हरलं, 'त्या' एका बॉलने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं!

हसन अलीचं हे कॅच सोडणं पाकिस्तानी संघाला नंतर चांगलंच महागात पडलं. हसन अलीच्या या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर पाकिस्तानी चाहते चांगलेच नाराज झाले असून सोशल मीडियावर हसन अलीला धमकी दिली जात असून शिव्याशाप देण्यात आले आहेत. अशावेळी भारतीय नेटकऱ्यांनी #INDwithHasanAli असा हॅशटॅग ट्रेंडिंग करत हसन अलीची पाठराखण केली आहे.

ऐन मोक्याच्या क्षणी हसन अलीकडून झेल सोडल्यानंतर तो प्रचंड हतबल झाला. पण तरीही सामना संपलेला नव्हता. त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूने अशा प्रकारे हतबल होता कामा नये हे ओळखून शोएब मलिक तात्काळ त्याच्याजवळ धावत गेला आणि त्याचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करु लागला. पण त्यानंतर सलग तीनही चेंडूवर तीन सिक्स मारुन ऑस्ट्रेलियाने आरामात हा सामना जिंकला.

#INDwithHasanAli सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये, वेडचा कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर पाक चाहते भडकले
PakVsAus: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिम्सचा महापूर; तुम्हालाही आवरणार नाही हसू

मॅथ्यू वेडने केवळ 17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह तब्बल 41 धावा केल्या. मॅथ्यू वेडची ही खेळी किती धमाकेदार होती याचा अंदाज आपल्याला यावरुन लावता येईल की, एका वेळी ऑस्ट्रेलियाला 24 चेंडूत 50 धावांची गरज होती. तरी देखील ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि तो सुद्धा 6 चेंडू शिल्लक ठेवून.

#INDwithHasanAli सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये, वेडचा कॅच सोडणाऱ्या हसन अलीवर पाक चाहते भडकले
T20 World Cup : कांगारुंच्या शेपटाचा पाकिस्तानच्या विजयरथात अडसर, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in