23 एप्रिल, 5 वर्षांचा कालावधी आणि RCB ची आयपीएलमध्ये पुन्हा दाणादाण

हैदराबादने उडवली RCB च्या फलंदाजाजंची दाणादाण, संपूर्ण संघ 68 धावांत गारद
23 एप्रिल, 5 वर्षांचा कालावधी आणि RCB ची आयपीएलमध्ये पुन्हा दाणादाण
फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणाऱ्या RCB ची अवस्था पुन्हा एकदा दयनीय झालेला पहायला मिळाली. मार्को जेन्सन, टी. नटराजन यांच्या भेदक माऱ्यासमोर RCB चा संघ अवघ्या 68 धावांत माघारी परतला. सुयश प्रभुदेसाईच्या 15 धावा या RCB च्या संघातील फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या.

या सामन्याच्या निमीत्ताने RCB साठी एक दुर्दैवी योगायोग पुन्हा एकदा जुळून आला. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आजच्या दिवशी सर्वबाद 49 अशी आपली निच्चांकी धावसंख्या नोंदवली होती. यानंतर 5 वर्षांनी आजच्या दिवशी RCB ने आयपीएलमधली आपली दुसरी निच्चांक धावसंख्या नोंदवली.

दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सनने भेदक मारा करत RCB च्या आघाडीच्या फळीतील तीन खंद्या फलंदाजांना माघारी धाडलं. या धक्क्यातून RCB चा संघ कधी सावरुच शकला नाही. मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल आणि सुयश प्रभुदेसाईने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू SRH च्या फिल्डर्सनी आपल्या गोलंदाजांना उत्तम साथ देत बंगळुरुचा डाव झटपट गुंडाळला.

23 एप्रिल, 5 वर्षांचा कालावधी आणि RCB ची आयपीएलमध्ये पुन्हा दाणादाण
IPL 2022 : विराट कोहली शून्यावर आऊट, सोशल मीडियावर क्रिकेट फॅन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर

हैदराबादकडून जगदीश सुचीथने 2 तर भुवनेश्वर आणि उमरान मलिकने 1-1 विकेट घेत जेन्सन आणि नटराजनला चांगली साथ दिली.

23 एप्रिल, 5 वर्षांचा कालावधी आणि RCB ची आयपीएलमध्ये पुन्हा दाणादाण
विराट कोहलीला विश्रांतीची गरज आहे - माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्वाचं विधान

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in