IPL Head to Head : रोहित विरुद्ध विराट रंगणार सामना; कोणाच पारडं आहे जड? - Mumbai Tak - ipl 2023 mi vs rcb match preview rohit sharma faf du plessis virat kohli royal challengers bangalore vs mumbai indians updates - MumbaiTAK
स्पोर्ट्स

IPL Head to Head : रोहित विरुद्ध विराट रंगणार सामना; कोणाच पारडं आहे जड?

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023 season) मधील पाचवा सामना आज (रविवारी) बेंगळुरूत खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा हा सामना रंगणार आहे.
Updated At: Apr 03, 2023 07:43 AM
Mumbai Indians and Royal Challengers Bangalore will be face to face.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023 season) मधील पाचवा सामना आज (रविवारी) बेंगळुरूत खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा हा सामना रंगणार आहे. रॉलय चॅलेंजर्सची कॅप्टनशीप फाफ डू प्लेसिसकडे आहे, पण खऱ्या अर्थाने फाईट होणार आहे ती रोहित आणि विराट या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये. त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी आजचा सामना सुपरहिट संडे ठरण्याची शक्यता आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. पण यात कोणाच पारडं जड असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (Mumbai Indians and Royal Challengers Bangalore will be face to face.)

आरसीबी :

आरसीबीच्या कुमकवत बाजू :

IPL 2020 पासून, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबई विरुद्ध 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीत जरी आरसीबी सरस ठरत असली तरीही स्टार खेळाडू रजत पाटीदार, जोश हेझलवूड, विल जॅक्स, वानिंदु हसरंगा आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्याशिवाय मैदानात उतरणार असल्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीपुढे मोठे आव्हान असणार आहे. रजत पाटीदारने गेल्या वर्षी आठ सामन्यांत 55.50 च्या सरासरीने 333 धावा केल्या होत्या. पहिल्या क्वालिफायरमध्ये तो सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाजाचे बनला होता.

हेही वाचा : Salim Durani : टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे निधन

हे खेळाडू असणार आरसीबीची जमेची बाजू :

कॅप्टन फाफ डू डुप्लेसिसने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये 369 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीनेही अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय न्यूझीलंडच्या मायकेल ब्रासवेलच्या रूपाने आरसीबीला खालच्या फळीत आक्रमक फलंदाज मिळाला आहे. दिनेश कार्तिकही मोक्याच्या क्षणी आक्रमक धावा फटकावण्यात पटाईत आहे. हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. रीस टोपलीच्या आगमनाने आरसीबीच्या गोलंदाजीला एक धार मिळाली आहे.

मुंबई इंडियन्स :

हे स्टार खेळाडू असणार मुंबईची ताकद :

मुंबई इंडियन्सने गेल्या आयपीएलमध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकून शेवटचे स्थान गाठले होते. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आणि पाच वेळचा विजेता असलेला मुंबईचा संघ यंदा ही कामगिरी विसरून पुढे जाण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि झाय रिचर्डसन दुखापतीमुळे बाहेर असणार आहेत. त्यामुळे मुंबईला या दोघांशिवाय मैदानात उतरण्याचं आव्हान असणार आहे.

हेही वाचा : GT vs CSK IPL 2023: गुजरात टायटन्सविरुद्ध CSK च्या पराभवाची 5 कारणं

मुंबईच्या जमेच्या बाजू :

बुमराह आणि रिचर्डसन अनुपस्थितीमध्ये संघाच्या आशा इंग्लंडचा स्टार वेगवाग गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असणार आहेत. जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल यांच्यासोबत आर्चर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी सूर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांच लक्ष असणार आहे. दुसऱ्या बाजूला ईशान किशनकडून मोठ्या फटक्यांची आणि खेळीची अपेक्षा असणार आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मायकेल ब्रेसवेल.

हेही वाचा : Virat kohli निवृत्त होतोय का?, ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ

मुंबई इंडियन्स :

रोहित शर्मा (कर्णधार) , सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वढेरा, हृतिक शोकिन, अर्शद खान, ड्वेन जेन्सन, कुमार चाउष, पियुष कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!