'महाराष्ट्र केसरी'ला फक्त मानाची गदा, बक्षिसाची रक्कम नाहीच; विजेत्या पृथ्वीराज पाटीलची खंत

तांत्रिक कारण देत आयोजन समितीकडून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, माजी मल्लांनी व्यक्त केली नाराजी
'महाराष्ट्र केसरी'ला फक्त मानाची गदा, बक्षिसाची रक्कम नाहीच; विजेत्या पृथ्वीराज पाटीलची खंत

महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात मानाचं स्थान असलेली ६४ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा शनिवारी साताऱ्यात पार पडली. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने २२ वर्षांचा जिल्ह्याचा दुष्काळ संपवत मुंबईच्या विशाल बनकरवर मात करत मानाची गदा पटकावली. परंतू या विजेतेपदानंतरही पृथ्वीराज पाटीलच्या मनात एक खंत कायम आहे. शनिवारी स्पर्धा जिंकल्यानंतर साताऱ्यात पृथ्वीराजची जल्लोषात मिरवणूक निघाली, कोडकौतुक झालं. मानाची गदा आणि चषकही मिळाला.

परंतू रोखरकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे पृथ्वीराज पाटीलची निराशा झाली आहे. महाराष्ट्रा केसरी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत स्पर्धा जिंकणाऱ्या मल्लाला आयोजन समितीकडून बक्षीस दिलं जातं. कोरोनामुळे दोन वर्ष स्पर्धा बंद असल्यामुळे मल्लांचा सराव सुटला होता. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर साताऱ्यात या स्पर्धेने दमदार कमबॅक केलं. परंतू विजेतेपद मिळाल्यानंतरही रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे अखेरीस का होईना या स्पर्धेच्या आयोजनाला गालबोट लागलं आहे.

'महाराष्ट्र केसरी'ला फक्त मानाची गदा, बक्षिसाची रक्कम नाहीच; विजेत्या पृथ्वीराज पाटीलची खंत
महाराष्ट्र केसरी: २२ वर्षांचा दुष्काळ संपवत कोल्हापूरचा पठ्ठ्या पाहतोय ऑलिम्पिकचं स्वप्न

१९ वर्षीय पृथ्वीराज पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची खंत व्यक्त करुन दाखवली.

महाराष्ट्र केसरी विजेत्या पृथ्वीराजचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
महाराष्ट्र केसरी विजेत्या पृथ्वीराजचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल सोनबा गोंगाणे यांनी आवाज उठवत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब घरातून येत असतात. त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गदेसोबत रोख रक्कमही मिळणं गरजेचं असल्याचं सोनबा गोंगाणे यांनी म्हटलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा जिंकल्यानंतर पृथ्वीराज पाटीलच्या हातात १ लाखांचा चेकही देण्यात आला. परंतू हा चेक फक्त नावापुरता असून मानाची स्पर्धा जिंकणाऱ्या मल्लाच्या हातात एक रुपयाही पडलेला नाही.

'महाराष्ट्र केसरी'ला फक्त मानाची गदा, बक्षिसाची रक्कम नाहीच; विजेत्या पृथ्वीराज पाटीलची खंत
Maharashtra kesari 2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’

यासंदर्भात सातारा तालीम संघाचे आयोजक सुधीर पवार यांच्याशी मुंबई तक ने संपर्क साधला असता त्यांनी यावर थेट भाष्य न करता प्रकरण सावरुन घेण्याचा प्रयत्न केला. "महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद प्रशासन व आयोजक म्हणून आम्ही स्पर्धेदरम्यान पैलवानांना चांगली सुविधा, जेवण, दूध, राहण्याची सोय उत्तमरित्या उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान पृथ्वीराज पाटील यांना मानाची गदा टायटल सन्मानार्थ दिला गेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची आपण बोलणार आहोत. योग्य तो चांगला निर्णय महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत दिला जाईल. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचे भविष्य उज्वल आहे त्यांना पाठबळ दिले जाईल." पृथ्वीराज पाटीलने व्यक्त केलेल्या खंत बाबत बोलण्यास सुधीर पवार यांनी नकार दिला.

तर दुसरीकडे स्पर्धेचे संयोजक दीपक पवार यांनी तांत्रिक कारण देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. "महाराष्ट्र केसरी विजेत्या स्पर्धकाला बक्षीसाची रक्कम आम्ही संयोजक म्हणून द्यायची असं यजमानपद घेताना ठरलं नव्हतं. या स्पर्धेच्या यजमानपद आणि आयोजनासाठी आम्ही कुस्तीगीर परिषदेला २१ लाखांचा चेक दिला. त्यानंतर येणाऱ्या प्रशिक्षकांचं मानधन, गुणफलक आणि अन्य तांत्रिक गोष्टींवर कोट्यवधींमध्ये खर्च झाला आहे. अशात आम्हाला पृथ्वीराज पाटीलला ५१ हजाराचं बक्षीस देण्यास काहीच अडचण नव्हती, परंतू यजमानपद घेताना हे ठरलेलं नव्हतं", अशी प्रतिक्रीया संयोजक दीपक पवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.