Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल

Gender Neutral दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत MCC चं महत्वाचं पाऊल
Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार असलेल्या MCC (Marylebone Cricket Club) ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूचा उल्लेख Batsman किंवा Batsmen असा न करता Batter किंवा Batters असा करण्यात येणार आहे. Gender Neutral दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCC ने या नवीन नियमाला तात्काळ मंजूरी देऊन लगेच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

"क्रिकेट हा खेळ सर्वांसाठी आहे असं MCC चं ठाम मत आहे. बदलत्या जमान्यात आमचा हा निर्णय क्रिकेट या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असं आम्हाला वाटतं", अशी प्रतिक्रीया MCC च्या Cricket and Operations विभागाचे सहायक सचिव जेमी कॉक्स यांनी दिली.

एकीकडे पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांप्रमाणे महिला क्रिकेटलाही आता जोरदार प्रतिसाद मिळत आहे. परंतू अनेकदा महिला क्रिकेट सामन्यांचं वृत्तांकन करताना फलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूला काय म्हणावं यावरुन अनेकदा उहापोह झाले आहेत. फिल्डर आणि बॉलर हे दोन शब्द पुरुष आणि महिला क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करताना त्रयस्थ शब्द म्हणून योग्य ठरतात. परंतू फलंदाजीवेळी Batsman शब्दामुळे अनेकदा चर्चा आणि वाद-विवाद रंगले आहेत. त्यावरच उपाय म्हणून MCC ने स्त्री-पुरुष समानतेसाठी Batter हा शब्द वापरण्याचं ठरवलं आहे.

Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल
जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण...England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

याआधी २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) चर्चा करून महिला क्रिकेटच्या दृष्टीने काही शब्दावली निश्चित करण्यात आली. पण त्यावेळी ‘बॅट्समन’ आणि ‘बॅट्समेन’ हे शब्द त्यात कायम ठेवण्यात आले होते. परंतु आता एकवचनी ‘बॅटर’ आणि अनेकवचनी ‘बॅटर्स’ हे दोन शब्द यात समाविष्ट केले आहेत.

Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल
Dhoni ला कर्णधार करण्यावरुन माझ्या मनात शंका होती, पवारांनी सांगितला भारताच्या कॅप्टन निवडीचा किस्सा

Related Stories

No stories found.