१७ ऑक्टोबरला IPL च्या दोन संघांचा लिलाव रंगण्याचे संकेत

IPL 2022 मध्ये दोन नवीन संघ सहभागी होणार
१७ ऑक्टोबरला IPL च्या दोन संघांचा लिलाव रंगण्याचे संकेत
फोटो सौजन्य - आयपीएल

आगामी हंगामापासून आयपीएलमध्ये दोन संघ वाढणार असल्याची घोषणा बीसीसीआयने याआधीच केली होती. या दोन संघांसाठी बीसीसीआयने निवीदा मागवल्या होत्या. २०२२ सालापासून आयपीएल १० संघांमध्ये खेळवलं जाणार आहे. या दोन संघाचा लिलाव १७ ऑक्टोबरला रंगण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन संघांच्या लिलावातून बीसीसीआयला अंदाजे ५ हजार कोटींचा फायदा होणार आहे.

IPL चा अंतिम सामना संपल्यानंतर दोन दिवसांनी हा लिलाव दुबई किंवा मस्कत येथे पार पडेल असं कळतंय. या लिलावासाठी निवीदा दाखल केलेल्या कंपन्यांना बीसीसीआय लवकरच लिलावाची वेळ आणि तारीख कळवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘निविदा आमंत्रण’ ५ ऑक्टोबरपर्यंत खरेदी करता येतील. यासाठी २१ सप्टेंबर हा सर्व चौकशीसाठी शेवटचा दिवस असेल.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. यानुसार, २०२२ मध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला जाईल, त्यानंतर लीगमधील फ्रेंचायझींची संख्या १० पर्यंत वाढेल. जानेवारीमध्ये मेगा ऑक्शन घेतले जाऊ शकले.

संघांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक संघाला १४ किंवा १८ साखळी सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर ७ सामने आणि दूरच्या ठिकाणी ७ सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ७ सामने खेळायला मिळतात. पण संघांच्या वाढीमुळे, जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळायचे असतील, तर स्पर्धेची वेळ वाढेल. संघांना 2 गटांमध्ये विभागले जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in