IND vs NZ T20: वॉश्गिंटनची शर्थ पण ‘सुंदर’ खेळी व्यर्थ, इंडिया पराभूत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

New Zealand won by 21 runs: रांची: भारतीय संघाला (Team India) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिल्या T20 सामन्यात 21 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयासाठी 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावाच करू शकला. यावेळी भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 28 चेंडूत 50 धावांची जबरदस्त खेळी केली. ज्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. खरं तर वॉश्गिंटनने शेवटपर्यंत झुंज दिली. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (new zealand won by 21 runs in 1st t20 match vs india india vs new zealand)

वॉशिंग्टन प्रमाणेच सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) 47 धावांचे योगदान दिले. मात्र, एक चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. ज्यानंतर न्यूझीलंडने भारताच्या हातातून सामना खेचून घेतला. भारताला शेवटच्या षटकात 33 धावा हव्या होत्या, जे आव्हान खूप कठीण होतं.

Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये माहीची एन्ट्री, खेळाडूंसोबत रंगल्या गप्पा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते भारतीय संघासाठी खूप मोठे ठरले. सूर्यकुमार आणि सुंदर यांच्याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, डॅरिल मिशेलने 30 चेंडूत पाच षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 59 धावा केल्या. तर कॉनवेने 35 चेंडूंचा सामना करत 52 धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याच्याच जीवावर न्यूझीलंडने पहिल्या टी-20 सामन्यात मोठा विजय मिळवला.

या विजयानंतर न्यूझीलंडने 3 T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 शून्य अशी बढत घेतली आहे. त्यामुळे लखनौ आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवणं गरजेचं आहे. तरच भारतीय संघ ही टी20 मालिका जिंकू शकतो.

ADVERTISEMENT

Women’s IPL मध्ये Adani vs Ambani असा सामना पाहायला मिळणार, कसं?

ADVERTISEMENT

वनडे मालिकेत भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर टी-20 मालिकेत देखील टीम इंडिया तसाच विजय मिळवेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, पहिल्याच टी-20 सामन्यात किवी संघाने भारताला हादरा दिला आहे. त्यामुळे आता पुढील दोन्ही सामन्यांसाठी भारतीय संघाला कंबर कसावी लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT