...तोपर्यंत टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल होणार नाही - Jay Shah यांनी केलं स्पष्ट

...तोपर्यंत टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल होणार नाही - Jay Shah यांनी केलं स्पष्ट

T-20 World Cup नंतर विराट कॅप्टन्सी सोडणार असल्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा

टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवणार असल्याच्या वृत्ताला आता खुद्द BCCI चे सचिव जय शहा यांनी पूर्णविराम दिला आहे. जोपर्यंत टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत संघाच्या नेतृत्वात कोणतेही बदल होणार नाहीत असं जय शहा यांनी सांगितलं आहे.

"जोपर्यंत भारतीय संघ मैदानावर चांगली कामगिरी करतो आहे तोपर्यंत कॅप्टन्सीमध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." जय शहा इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते. टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर विराट कोहली वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे देईल अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. विराट टी-२० विश्वचषकानंतर फक्त कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळेल अशी चर्चा होती.

...तोपर्यंत टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल होणार नाही - Jay Shah यांनी केलं स्पष्ट
T-20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, रविचंद्रन आश्विन-भुवनेश्वर संघात परतले

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकाही ICC इव्हेंटमध्ये जिंकलेली नसली तरीही कसोटी मालिकेत विराटची कर्णधार म्हणून कामगिरी चांगली झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेत विराटच्या नेतृत्वाखाली भारत २-१ ने आघाडीवर आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यातही विराटच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर (३-२), ऑस्ट्रेलियावर (२-१), श्रीलंकेवर (२-०) आणि न्यूझीलंडवर (४-०) अशी मात केली.

...तोपर्यंत टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल होणार नाही - Jay Shah यांनी केलं स्पष्ट
जय शहांच्या डोक्यात कल्पना आली आणि...जाणून घ्या T-20 World Cup साठी MS Dhoni कसा बनला संघाचा मेंटॉर?

परंतू बाकीच्या मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणारा विराट भारताला आतापर्यंत एकही आयसीसीची महत्वाची स्पर्धा जिंकवून देऊ शकला नाहीये. यासाठीच बीसीसीआयने टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनीची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून घोषणा केली आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवाचा विराटसेनेला फायदा होईल असं बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळेच धोनीची मेंटॉरच्या जागेवर नियुक्ती झाली आहे.

...तोपर्यंत टीम इंडियाच्या नेतृत्वात बदल होणार नाही - Jay Shah यांनी केलं स्पष्ट
टीम इंडियाचा कॅप्टन Virat Kohli च राहणार ! BCCI ने नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळली

याआधी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनीही संघात नेतृत्वबदलाच्या शक्यता फेटाळून लावल्या होत्या. यानंतर खुद्द जय शहा यांनी दिलेल्या माहितीनंतर आता संघातील नेतृत्वबदलाची चर्चा आता थांबेल अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in