French Open Champion Rafael Nadal: नदालच बादशाह! फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं!

टेनिस स्टार राफेल नदालने फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात अगदी लिलया विजय मिळवला आहे.
French Open Champion Rafael Nadal: नदालच बादशाह! फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं!
rafael nadal vs casper ruud french open 2022 tennis nadal won french open title for 14th time(फोटो सौजन्य: गेटी)

पॅरिस: राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. पॅरिसमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालने आठव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 6-3, 6-3, 6-0 असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना तब्बल 2 तास 18 मिनिटे चालला. नदालचे हे 14वे फ्रेंच ओपन जेतेपद ठरले. तसेच, नदालचे हे एकूण 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

36 वर्षीय राफेल नदाल फ्रेंच ओपन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, रुड पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

नदालने असा मिळवला विजय

* तिसऱ्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये राफेल नदालने कॅस्पर रुडची सर्व्हिस तोडली. त्यावेळी नदाल 3-0 ने आघाडी घेतली होती.

दुसरा सेट: (नदालचा 6-3 असा विजय)

* राफेल नदालने पुढील दोन गेम जिंकले आणि दुसरा सेट 6-3 असा जिंकला.

* दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली.

उपांत्य फेरीत दुसऱ्या सेटदरम्यान जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध दुखापत झाल्याने नदालला वॉकओव्हर मिळाला होता. त्यामुळे तो थेट अंतिम फेरीत पोहचला. झ्वेरेव्हच्या पायाला दुखापत झाल्याने तो पुढे खेळू शकला नाही. पण तोवर झ्वेरेव्हने नदालला चांगली लढत दिली होती. या सामन्यात नदाल 7-6 (10-8), 6-6 ने आघाडीवर होता. दुसरीकडे, कॅस्पर रुडने उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा 3-6, 6-4, 6-2, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

rafael nadal vs casper ruud french open 2022 tennis nadal won french open title for 14th time
फ्रेंच ओपनमध्ये 21 वर्षीय टेनिसस्टारचा जलवा

नदालचे ग्रँडस्लॅम जेतेपद

  • फ्रेंच ओपन - 14

  • यूएस ओपन - 4

  • ऑस्ट्रेलियन ओपन - 2

  • विम्बल्डन - 2

नदालची 30वी ग्रँडस्लॅम फायनल

नदालने आजपर्यंत फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गमावलेली नाही. नदालला क्ले कोर्टचा राजा म्हटले जाते. यंदा तो फ्रेंच ओपनचा 14वा अंतिम सामना खेळण्यासाठी आला होता. राफेल नदालने आपल्या टेनिस कारकिर्दीत 30व्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 ची फायनल जिंकून, त्याने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचचा सर्वाधिक 20-20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in