इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्ट मॅचमध्ये रविचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला १०० वर्ष जूना विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये ५७८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताने पहिल्या इनिंगमध्ये ३३७ रन्सपर्यंत मजल मारली. चौथ्या दिवशी इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.
अवश्य वाचा – ऋषभ पंत ICC Player of The Month पुरस्काराचा मानकरी
दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींगसाठी मैदानात उतरलेल्या रोरी बर्न्सला आश्विनने पहिल्या बॉलवर अजिंक्य रहाणेकरवी कॅचआऊट केलं. यानिमीत्ताने आश्विन गेल्या १०० वर्षात टेस्ट मॅचमध्ये इनिंगच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आश्विनच्या आधी १९०७ साली दक्षिण आफ्रिकेच्या बर्ट वोल्गर यांनी हा पराक्रम केला होता. याआधी १८८८ साली इंग्लंडचे स्पिनर बॉलर बॉबी पील यांनी अशी कामगिरी करुन दाखवली होती.
Batsmen Ashwin has dismissed most in Tests:
David Warner 10
Alastair Cook 9
BEN STOKES 8
Ed Cowan 7Has troubled the Left handers#IndiavsEngland
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) February 8, 2021
पहिल्या इनिंगमध्ये ५०० रन्सचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडला टीम इंडियाच्या बॉलर्सनी चांगलचं जखडवून ठेवलं. टी-सेशनपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट गमावत ११९ रन्सपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडे ३६० रन्सचा लीड असून आता या मॅचचा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – कौतुकास्पद ! ऋषभ पंत मॅच फी उत्तराखंडमधील बचावकार्याला देणार