याला म्हणतात दहशत ! अँडरसनच्या बॉलिंगवर पंतचा रिव्हर्स स्विप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यात दमदार कमबॅक केलं. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर ऋषभने सर्वात आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसोबत संघाचा डाव सावरला. आपल्या नेहमीच्या शैलीत पंतने फटकेबाजी करत इंग्लंडच्या बॉलर्सवर हल्ला चढवला.

Ind vs Eng : विराट कोहली शून्यावर आऊट, नकोशा विक्रमाची नोंद

मैदानात स्थिरावल्यानंतर पंतचा कॉन्फिडन्स इतका वाढला की त्याने जेम्स अँडरसनसारख्या कसलेल्या बॉलरला रिव्हर्स स्विपचा फटका खेळत आपले इरादे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० विकेट्स नावावर असलेला अँडरसन हा दिग्गज बॉलर म्हणून ओळखला जातो. अशा प्लेअरविरुद्ध रिव्हर्स स्विपचा शॉट खेळलेल्या पंतचं सध्या सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. पाहा हा व्हिडीओ…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेत ऋषभने आपलं शतक पूर्ण केलं. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटच्या बॉलिंगवर पुढे येऊन रुटने खणखणीत सिक्सर लगावला आणि भारतातल्या आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली. ११८ बॉलमध्ये १३ फोर आणि २ सिक्स मारत पंत १०१ रन्सची इनिंग खेळून आऊट झाला. जेम्स अँडरसननेच त्याची विकेट घेतली. परंतू तोपर्यंत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटला ढकलण्यात पंत यशस्वी ठरला होता.

Ind vs Eng 4th Test: ऋषभ पंतची सेंच्युरी, भारताचं कमबॅक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT