CSK vs GT : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कमाल!, IPLच्या पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्यूरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ruturaj gaikwad half century
ruturaj gaikwad half century
social share
google news

Ruturaj gaikwad Half Century CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात तुफानी खे्ळी केली आहे. ऋतुराज गायकवाडने पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्यूरी ठोकली आहे. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) गुजरात टायटन्सच्य़ा एका एका गोलंदाजाला फोडून काढले आहे. ऋतुराज गायकवाडने 50 बॉलमध्ये 92 धावा ठोकल्या आहेत.या खेळीत त्याने तब्बल 9 षटकार आणि 4 चौकार लगावले आहेत. या त्याच्या या तुफानी खेळीने चेन्नई सुपर किंग्जने 178 गुजरात समोर धावांचा डोंगर उभारला आहे.(ruturaj gaikwad hits half century in first ipl match against gujrat titans)

Ruturaj Gaikwad running riot at the moment!#IPL2023 #GTvCSK pic.twitter.com/IzXsOoBKZS

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दीक पंड्याने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजीला उतरली होती. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती.कारण डेवोन कॉन्वे 1 धावा करून आऊट झाला. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर त्याचा निभाव लागला आणि तो क्लीन बोल्ड झाला. कॉन्वे नंतर मोईन अली मैदानात आला. त्याने मैदानात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 23 धावा करून तो बाद झाला.या खेळीत त्याने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला आहे.

एकीकडे एका बाजूने विकेट पडत असताना दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) दुसऱ्या बाजूने त्याने डाव सावरला होता. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) तुफान हाफ सेंच्यूरी ठोकली होती. त्यानंतर तो शतकाच्या दिशेने होता. एका पॉईंटला तो शकत ठोकेल असे फॅन्सना वाटत होते. पण 92 धावावर तो आऊट झाला. त्याने या 92 धावांच्या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकार लगावले आहे. त्याच्या विकेटनंतर एकाही खेळाडूला मैदानात साजेशा धावा करता आल्या नाही. बेन टोक्स 7, अम्बाती रायडू 12, शिवम दुबे 19 तर रविंद्र जडेजा 1 धावाकरून आऊट झाला. महेंद्र सिंह 14 धावा करून नाबाद राहीला. दरम्यान गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी,राशीद खान, अल्झारी जोसेफने प्रत्येकी 2,आणि जोशूआ लिटलने 1 विकेट घेतली आहे.

ADVERTISEMENT

ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj gaikwad) 92 धावांच्या जोरावर चेन्नई 178 धावांचा डोंगर उभारू शकली आहे. आता गुजरात टायटन्ससमोर 179 धावांचे आव्हान असणार आहे. आता चेन्नईचे सुपर किंग्जचे बॉ़लर गुजरात 178 धावात रोखण्यात यशस्वी ठरतात की गुजरात पहिल्या विजयाची नोंद करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT