भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे खेळणार? पहा वर्षभराचं वेळापत्रक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Team India Schedule 2023: क्रिकेट क्षेत्रात भारतासाठी (BCCI)2023 हे वर्ष खास ठरणार आहे. यंदा प्रथमच विश्वचषक, आशिया चषक आणि जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामना भारतात खेळला जाणार आहे. भारताला आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 2011 नंतर, आयसीसी (ICCI) ओडीआय विश्वचषक पुन्हा एकदा भारतात फक्त 2023 मध्ये खेळला जाईल. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला (Indian Cricket Team) जिंकण्याची सुवर्णसंधी मिळेल. यासाठी, टीम इंडियाने 2023 मध्ये कोणत्या संघांसोबत कधी आणि कुठे खेळणार याचे वेळापत्रक जारी केलेले आहे. (Schedule Of Indian Cricket Team 2023)

2023 हे वर्ष टीम इंडियासाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. संघाला जागतिक कसोटी स्पर्धेचे विजेतेपदही पटकावण्याची इच्छा आहे. याशिवाय, हे वर्ष संघासाठी २०२४मध्ये होणार्‍या T20 विश्वचषकासाठी नवीन विचार आणि तयारीने परिपूर्ण असेल.

NPS ते आधार कार्ड… नव्या वर्षात ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये होणार बदल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीम इंडिया 2023मध्ये कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध खेळणार?

India Vs Shrilanka सीरीजने होणार सुरूवात

  • पहिला आंतरराष्ट्रीय T20- मुंबईत 3 जानेवारी 2023 रोजी होणार

  • दुसरा आंतरराष्ट्रीय T20- पुण्यात 5 जानेवारी 2023 रोजी होणार

  • ADVERTISEMENT

  • तिसरा T20- राजकोट येथे 7 जानेवारी 2023 रोजी होणार

  • ADVERTISEMENT

    वन-डे सीरीज

    • पहिली वन-डे सीरीज- गुवाहाटी येथे 10 जानेवारी 2023 रोजी होणार

  • दुसरी वन-डे सीरीज- कोलकाता येथे 12 जानेवारी 2023 रोजी होणार

  • तिसरी वन-डे सीरीज- तिरुवनंतपुरम येथे 15 जानेवारी 2023 रोजी होणार

  • India Vs New Zealand: जानेवारी/ फेब्रुवारी 2023

    • पहिली वन-डे सीरीज- हैदराबाद येथे 18 जानेवारी 2023 रोजी होणार

    • दुसरी वन-डे सीरीज- रायपूर येथे 21 जानेवारी 2023 रोजी होणार

    • तिसरी वन-डे सीरीज- इंदूर येथे 24 जानेवारी 2023 रोजी होणार

    T20 सीरीज

    • पहिली आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- रांची येथे येथे 27 जानेवारी 2023 रोजी होणार

    • दुसरी आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- लखनौ येथे 29 जानेवारी 2023 रोजी होणार

    • तिसरी आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- अहमदाबाद येथे 1 फेब्रुवारी 2023 रोजी होणार

    India Vs Australia: फेब्रुवारी/ मार्च 2023

    • पहिली कसोटी- नागपूर येथे ९ ते १३ फेब्रुवारी 2023 रोजी होणार

    • दुसरी कसोटी- दिल्ली येथे १७ ते २१ फेब्रुवारी 2023 रोजी होणार

    • तिसरी कसोटी- धर्मशाला येथे 1 ते ५ मार्च 2023 रोजी होणार

    • चौथी कसोटी- अहमदाबाद येथे ९ ते १३ मार्च 2023 रोजी होणार

    वन-डे सीरीज

    • पहिली वन-डे सीरीज- मुंबईत 17 मार्च 2023 रोजी होणार

    • दुसरी वन-डे सीरीज- विशाखापट्टणम येथे 19 मार्च 2023 रोजी होणार

    • तिसरी वन-डे सीरीज- चेन्नईत 22 मार्च 2023 रोजी होणार

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वन-डे सीरीजनंतर, टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयपीएल २०२३ च्या आगामी हंगामात व्यस्त असतील. जो एप्रिल ते मे या कालावधीत खेळला जाऊ शकतो. टीम इंडिया सध्या जागतिक कसोटी सामन्याच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारत जूनपर्यंत याच स्थानावर राहिला तर जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामनाही खेळताना दिसू शकतो. या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

    वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरीजचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. मात्र या सीरीजमध्ये दोन कसोटी सामने, तीन वन-डे सामने आणि तेवढेच टी-२० सामने खेळले जाणार आहेत. आशिया चषक या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानला न जाण्यावरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू आहे.

    ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३पर्यंतचे पुढील वेळापत्रक

    zभारतात होणाऱ्या ICC वन-डे विश्वचषक २०२३ च्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची वन-डे सीरीज खेळणार आहे. या वर्षी भारत प्रथमच संपूर्ण आयसीसी वन-डे विश्वचषक भूषवणार आहे आणि ते पहिल्यांदाच होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळली जाईल. वन-डे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया वर्षभरात तिसऱ्यांदा भारताविरुद्ध मालिका खेळणार, ज्यामध्ये पाच टी-20 सामन्यांचा समावेश असेल. डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये कसोटी, वन-डे सीरीज आणि टी-२० या तीन सीरीजचा समावेश आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT