Shreyas Iyer ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीतून बाहेर, त्याच्या जागी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shreyas iyer : पाठीच्या दुखापतीमुळे (Shreyas Iyer) श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind Vs Aus Series) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या बाहेर पडल्यानंतर, (Indian Team Manegment) भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला (Shubahman Gill) पसंती देऊन मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला (Shubhman Gill) खेळवण्याचा विचार करू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या घरच्या मालिकेतून बाहेर पडलेला अय्यर दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. (Shreyas Iyer out of first Test against Australia)

श्रेयस अय्यरच्या जागी कोण?

श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरण्यात अयशस्वी ठरला आहे आणि तो संघातून बाहेर असल्याने भारतीय मधल्या फळीत एक स्थान निर्माण होईल. या जागेचे दावेदार सूर्यकुमार आणि गिल आहेत. सूर्यकुमारने आपल्या कारकिर्दीत फक्त मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. तर गिलने कसोटी क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघातील बहुतांश डावांत सलामीला खेळी केली आहे. आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत सातत्य राखणारा अय्यर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2-0 अशा मालिका विजयातही प्रभावी ठरला होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “जेव्हा न्यूझीलंडचा संघ 2021 च्या उत्तरार्धात भारतात आला तेव्हा शुबमन गिलच्या नावाचा मधल्या फळीत विचार करण्यात आला कारण KL राहुलने मयंक अग्रवालसोबत डावाची सुरुवात करणार होते.” यानंतर राहुल जखमी झाला आणि गिलने डावाला सुरुवात केली. यानंतर तो पुन्हा जखमी झाला. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मधल्या फळीसाठी त्याच्या नावाचा विचार केला जात होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संघात सलामीची जोडी म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार राहुलला पहिली पसंती आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवा क्रम अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण या क्रमाने उतरणारा फलंदाज दुसऱ्या नव्या चेंडूला सामोरे जाईल अशी अपेक्षा असते.

गिलच्या बाबतीत, कसोटी क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळून आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कारकीर्दीची सुरुवात कसोटीतून केल्याने, त्याचं पारडं जड आहे. माजी राष्ट्रीय निवडकर्ताच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रभारी होता, तेव्हा गिल वेस्ट इंडिजच्या ‘अ’ दौऱ्यावर मधल्या फळीत खेळला होता, जिथे त्याने द्विशतकही केले होते. किंबहुना, सुरुवातीला तो मधल्या फळीतील फलंदाज होता ज्याचे रुपांतर सलामीवीरात झाले.

ADVERTISEMENT

फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंविरुद्ध सूर्यकुमारचे वर्चस्व निर्णायक ठरू शकते. तो म्हणाला, “जर नॅथन लियॉनला त्याचे ऑफ-स्पिन चेंडू अधिक फिरवता आले, तर सूर्यकुमार त्याच्या फूटवर्कने त्याची लय खराब करू शकतो, परंतु पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडच्या विरोधात गिल हा एक चांगला पर्याय आहे.”

ADVERTISEMENT

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका

• पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर

• दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली

• तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला

• चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

    follow whatsapp

    ADVERTISEMENT