FIFA World cup 2022 : अर्जेंटिनाच्या मेसीच्या शानदार खेळीमुळे क्रोएशियाचा 3-0 ने पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अर्जेंटिनाने चमकदार कामगिरी करत फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. मंगळवारी (13 डिसेंबर) रात्री उशिरा लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. आता 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

ADVERTISEMENT

या विजयामुळे जिथे अर्जेंटिना आता तिसर्‍यांदा विजेतेपद मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे, तिथे लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली प्रथमच विजेतेपद पटकावण्याच्या क्रोएशियन संघाची निराशा झाली आहे. या सामन्यात अर्जेंटिना संघाच्या विजयाचे नायक हे दोन खेळाडू होते. एक कर्णधार लिओनेल मेस्सी आणि दुसरा 22 वर्षांचा युवा खेळाडू ज्युलियन अल्वारेझ होता. मेस्सी आणि अल्वारेझने मिळून असा खेळ दाखवला की विरोधी संघ चक्रावून गेला. 35 वर्षीय लिओनेल मेस्सीने एक आणि ज्युलियन अल्वारेझने दोन गोल केले.

अर्जेंटिनाला कामाला आली ही रणनिती

तसं पाहिलं तर अर्जेंटिनाचा संघ या उपांत्य फेरीच्या सामन्यात 4-4-2 अशा फॉर्मेशनसह क्रोएशियन संघाचे मिडफील्डमधील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी उतरला होता. लिओनेल मेस्सी ब्रिगेडलाही काही प्रमाणात यश मिळाले. संपूर्ण सामन्यात बॉल पोझिशनच्या बाबतीत क्रोएशियाचा संघ नक्कीच पुढे होता, पण गोल करण्यात अर्जेंटिना पुढे होता आणि पहिल्या हाफमध्ये दोन गोल आणि दुसऱ्या हाफमध्ये एक गोल करत क्रोएशियन संघाचे मनसुबे उधळले.

हे वाचलं का?

गोलकिपरची चुक पडली महागात

सामन्याचा पहिला मोठा क्षण खेळाच्या ३२ व्या मिनिटाला आला जेव्हा क्रोएशियन गोलकीपर डॉमिनिक लिव्हकोविकने केलेल्या चुकीमुळे अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. वास्तविक, लिवाकोविचने ज्युलियन अल्वारेझला पेनल्टी एरियामध्ये टाकले होते, त्यामुळे रेफ्रीनं हा निर्णय दिला. कर्णधार मेस्सी स्वतः पेनल्टी किक घेण्यासाठी आला आणि त्याने सामन्याच्या ३४व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला १-० ने आघाडीवर नेले. पाच मिनिटांनंतर, म्हणजेच ३९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या संघाला दुसरा गोल झाला, जो ज्युलियन अल्वारेझने केला.

एन्झो फर्नांडिसनेही चांगला खेळ दाखवला. दुसऱ्या गोलमुळे क्रोएशियाचा संघ बॅकफूटवर आला होता. पूर्वार्धात आणखी एकही गोल झाला नाही, त्यामुळे अर्जेंटिनाच्या बाजूने स्कोअर २-० असा राहिला. बघितले तर, पूर्वार्धात अर्जेंटिनाने गोल करण्याचे ५ प्रयत्न केले, त्यापैकी ४ लक्ष्यावर होते. त्याचवेळी क्रोएशियाने ४ वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. बॉल पोझिशनबद्दल बोलायचे झाले तर क्रोएशियन संघ ६२ टक्क्यांनी पुढे होता.खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियन चाहत्यांना त्यांचा संघ पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. उत्तरार्धाच्या पहिल्या सहा मिनिटांतच क्रोएशियानेही तीन खेळाडू बदलले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्जेंटिनाने काउंटर अ‍ॅटॅकिंग खेळ सुरू ठेवला, त्यामुळे ६९व्या मिनिटाला स्कोअर ३-० असा झाला. अर्जेंटिनासाठी हा गोल ज्युलियन अल्वारेझने लिओनेल मेस्सीच्या सर्वोत्तम पासवर केला. 0-3 ने पिछाडीवर पडल्यानंतर क्रोएशियन खेळाडूंचा उत्साह खचला होता. अखेर अर्जेंटिनाने हा सामना ३-० ने जिंकला.

ADVERTISEMENT

संपूर्ण सामन्याची आकडेवारी पाहता अर्जेंटिनाने गोल करण्याचे 11 प्रयत्न केले, त्यापैकी 7 गोल ऑन टार्गेट होते. त्याचवेळी क्रोएशियाने 12 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये तिन 7 गोल ऑन टार्गेट होते. म्हणजेच क्रोएशियाने गोल करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण त्यांना अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टिनेझ आणि डिफेंडरवर मात करता आली नाही, हे दिसून येते. बॉल पोझीशनबद्दल बोलायचे झाल्यास, क्रोएशियन संघाने 61 आणि अर्जेंटिनाने 39 टक्के बॉल आपल्याकडे राखून ठेवला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT