बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना कोरोनाची लागण, बंगळुरुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. बंगळुरुतील एका रुग्णालयात पदूकोण यांच्यावर उपचार सुरु आहेत, पदूकोण यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी अनिशा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश पदूकोण यांना ताप आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली ज्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. “काही दिवसांपूर्वी […]
ADVERTISEMENT
भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. बंगळुरुतील एका रुग्णालयात पदूकोण यांच्यावर उपचार सुरु आहेत, पदूकोण यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी अनिशा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश पदूकोण यांना ताप आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली ज्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
“काही दिवसांपूर्वी पदूकोण यांच्या परिवारातील तिन्ही सदस्यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला प्रकाश पदूकोण यांनी घरातच स्वतःला आयसोलेट केलं होतं, परंतू त्यांचा ताप कमी झाला नाही ज्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांची पत्नी उज्वला आणि मुलगी अनिशालाही कोरोनाची लागण झाली. प्रकाश पदूकोण यांच्यावर सध्या रुग्णालयाच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. येत्या २-३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.” बॅडमिंटन कोच विमल कुमार यांनी माहिती दिली.
विमल कुमार हे प्रकाश पदूकोण यांच्या बॅडमिंटन अकादमीचे प्रशिक्षक आणि संचालक म्हणूनही काम पाहतात. १९७० ते ८० च्या दशकात भारतीय बॅडमिंटनचं नाव जागतिक पातळीवर उंचावण्यात पदूकोण यांचा मोलाचा वाटा मानला जातो. All India England Championship स्पर्धा जिंकणारे पदूकोण हे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. यानंतर १९८३ साली झालेल्या World Championship स्पर्धेतही प्रकाश पदूकोण यांनी ब्राँझ पदक मिळवलं होतं, अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते.
हे वाचलं का?
१९८० साली All India England Championship, Swedish Open आणि Denmark Open या दोन स्पर्धांची लागोपाठ विजेतेपद मिळवल्यानंतर पदूकोण जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होते. १९९१ साली पदूकोण यांनी निवृत्ती स्विकारली. ज्यानंतर काहीकाळा ते बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. १९९३ ते १९९६ या काळात त्यांनी भारतीय संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT