Ind vs Eng : वन-डे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, कृणाल पांड्याचं पुनरागमन
इंग्लंडविरुद्ध आगामी ३ वन-डे सामन्यांच्या सिरीजसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे टी-२० संघात फारसे बदल न करता आहे त्या खेळाडूंवरच चेतन चौहान यांच्या निवड समितीने विश्वास दाखवला आहे. २३ मार्चपासून या वन-डे सिरीजला सुरुवात होणार असून पुण्यातील गहुंजे मैदानावर हे तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत. विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी करणारा कृणाल पांड्या […]
ADVERTISEMENT
इंग्लंडविरुद्ध आगामी ३ वन-डे सामन्यांच्या सिरीजसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे टी-२० संघात फारसे बदल न करता आहे त्या खेळाडूंवरच चेतन चौहान यांच्या निवड समितीने विश्वास दाखवला आहे. २३ मार्चपासून या वन-डे सिरीजला सुरुवात होणार असून पुण्यातील गहुंजे मैदानावर हे तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत. विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी करणारा कृणाल पांड्या आणि कर्नाटकच्या प्रसिध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त मुंबईच्या सूर्यकुमार यादववरही निवड समितीने वन-डे सिरीजसाठी विश्वास दाखवला आहे. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्या रुपाने ४ मुंबईचे प्लेअर्स भारतीय संघात असणार आहेत.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.
— BCCI (@BCCI) March 19, 2021
दरम्यान, चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ रन्सनी मात करत भारतीय संघाने टी-२० सिरीजमध्ये २-२ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडला विजयासाठी भारताने १८६ रन्सचं टार्गेट दिलं होतं. शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि इतर भारतीय बॉलर्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला १७७ रन्सवरच रोखलं. इंग्लंडकडून जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी चांगले प्रयत्न केले. परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय बॉलर्सनी चांगलं कमबॅक करत इंग्लंडला धक्का दिला.
हे वाचलं का?
Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात
टीम इंडियाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ड्वाइड मलान आणि जेसन रॉय यांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशीप केली. चहरने मलाना क्लिनबोल्ड करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने हार्दिक पांड्याने धोकादायक ठरु पाहणाऱ्या जेसन रॉयलाही माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या बॉलर्सना घाम फोडला. राहुल चहरने पुन्हा एकदा आपली भूमिका चोख बजावत बेअरस्टोला माघारी धाडलं. शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये बेन स्टोक्स आणि ओएन मॉर्गनला आऊट करत इंग्लंडला आणखीनच बॅकफूटला ढकललं. जोफ्रा आर्चरने अखेरपर्यंतक मैदानावर टिकून फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतू त्याला अपयश आलं. यानंतर इंग्लंडचा संघ कमबॅक करु शकला नाही, आणि भारतीय संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
Ind vs Eng : अहमदाबादमध्ये मुंबईचा ‘सूर्य’तळपला, टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंच्युरी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT